Breast Cancer: ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतील! नवीन संशोधनातून समोर आली माहिती

स्तनाचा कर्करोग या संशोधनातून असे दिसून आले आहे की ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे पचन झाल्यानंतर एंडोकॅनाबिनॉइड रेणू EDP-EA नावाच्या रसायनात रुपांतर होते. कर्करोग आणि जळजळ यांचे परिणाम कमी करण्यासाठी हे रसायन प्रभावी ठरते.

Breast Cancer: ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतील! नवीन संशोधनातून समोर आली माहिती
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतील(फोटो: प्रातिनिधिक)

Breast Cancer: कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार आहे. त्याच वेळी, स्तनाच्या पेशींमध्ये सतत वाढ झाल्यास, स्तनाचा कर्करोग होतो. या स्थितीत स्तनामध्ये एक गाठ तयार होते, जी स्पर्शाने जाणवते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दरवर्षी १६ दशलक्ष लोक कर्करोगाने ग्रस्त असतात. तसंच १० पैकी एकाला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचा उपचार शक्य आहे. मात्र हा आजार बराच काळ ग्रासल्यास धोकादायक ठरू शकतो.

यासाठी कॅन्सरची लक्षणे दिसल्यानंतर लगेचच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे कधीही चांगले आहे. स्तनाच्या कर्करोगावर बरेच संशोधन झाले आहे आणि बरेच संशोधन केले जात आहे. एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे की ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्मूळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. चला जाणून घेऊया या संशोधनाविषयी सविस्तर माहिती.

(हे ही वाचा: Immunity Booster: रोज सकाळी ‘ही’ कामे करा, अनेक आजार जवळ देखील येणार नाहीत)

द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की सीफूडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. या संशोधनात १६०० लोकांचा समावेश करण्यात आला होता. ओमेगा ३ फॅटी अॅसिड हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नसल्याचं दिसून आलं. त्याच्या सेवनाने मधुमेह, मेटाबॉलिक विकार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. तसेच, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. यासाठी आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश करा.

आणखी एका संशोधनात असेही समोर आले आहे की ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यात प्रभावी ठरतात. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-चॅम्पेनच्या सहकार्याने करण्यात आले आहे . या संशोधनातून असे दिसून आले आहे की ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे पचन झाल्यानंतर एंडोकॅनाबिनॉइड रेणू EDP-EA नावाच्या रसायनात रुपांतर होते. कर्करोग आणि जळजळ यांचे परिणाम कमी करण्यासाठी हे रसायन प्रभावी ठरते. यासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् असलेले पदार्थ म्हणजेच सीफूड, सॅल्मन, चिया सीड्स, सॅल्मन, फ्लेक्ससीड्स, अक्रोड्स, ऑलिव्ह ऑईल यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करता येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Raksha Bandhan 2022: गायीच्या शेणाच्या राखीला परदेशात तुफान मागणी; ‘या’ देशांमधून मिळाली हजारोंची ऑर्डर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी