वन प्लसच्या १२८ जीबी ३ टी या फोनच्या विक्रीस अॅमेझॉनवर विक्रीस सुरुवात झाली आहे. वन प्लस ३ च्या आधीच्या व्हेरियंट्सला मिळालेला प्रतिसाद पाहता या फोनची देखील तुफानी विक्री होईल असा विश्वास कंपनीला वाटत आहे.  या फोनला प्रचंड मागणी असली तरी केवळ अॅमेझॉन प्राइमच्याच ग्राहकांसाठी हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज सकाळी १० ते रात्री दहा पर्यंत या फोनची विक्री होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सर्वांसाठी खुली विक्री अॅमेझॉनवर होणार आहे.

अॅमेझॉनने आपली अॅमेझॉन प्राइम ही सेवा सुरू केली आहे. थोड्या पैशांच्या मोबदल्यात अनेक विशेष सवलती या सेवेद्वारे मिळतात. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आठ दिवस आधी वन प्लस ३ टी त्यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  वन प्लस ३ टी ची किंमत ३४,९९९ रुपये आहे. याच फोनच्या ६४ जीबी व्हेरियंटची किंमत २९,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन गनमेटल कलरमध्ये उपलब्ध आहे. १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा हा सोनी आयएमएक्स २९८ या फीचर्ससोबत उपलब्ध आहे. तर फ्रंट कॅमेरा देखील ८ मेगापिक्सलवरुन १६ मेगापिक्सलचा करण्यात आला आहे. ३,४०० एमएएच ही शक्तीशाली बाटली या फोनमध्ये उपलब्ध आहे. ३० मिनिटे चार्ज केल्यास १ दिवसभर बॅटरी राहू शकेल असा दावा कंपनीने केला आहे. युएसबी टाइप पोर्ट आणि ३.५ मीमी हेडफोन जॅक या फोनला उपलब्ध आहेत. या फोनला ड्युएल सिम आहे आणि मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट केले जात नाही.