scorecardresearch

कांद्याचे सेवन केल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होऊ शकते; फक्त खाण्याची पद्धत एकदा जाणून घ्या

Onion and Diabetes: संशोधनानुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कांदा हा सर्वात स्वस्त आणि चांगला उपाय आहे.

कांद्याचे सेवन केल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होऊ शकते; फक्त खाण्याची पद्धत एकदा जाणून घ्या
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मधुमेह हा आजार आता सामान्य बनत चालला आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगली डाइट घेणं अत्यंत आवश्यक आहे. चांगला आहार घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

ब्रेथवेलबीइंगमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात आहारतज्ज्ञ रश्मी जीआर म्हणतात की, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पदार्थांची निवड विचारपूर्वक करायला हवी. मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते आणि असे रुग्ण आजारीही लवकर पडतात. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, ज्याच्या सेवनाने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येईल आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वेही मिळतील.

मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन खूप प्रभावी ठरते. एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, कांदा ही अशी भाजी आहे की त्याचा रस वापरल्यास रक्तातील साखर सहज नियंत्रित ठेवता येते. चला जाणून घेऊया कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर कशी नियंत्रित होते आणि त्याचे काय फायदे आहेत.

कांदे रक्तातील साखर कसे नियंत्रित करतात:

कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. ब्रिटीश वेबसाइट एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात हे समोर आले आहे की कांद्याचा अर्क रक्तातील साखर ५०% कमी करतो. मधुमेहाच्या रुग्णांनी कांद्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

सॅन डिएगो येथील एंडोक्राइन सोसायटीच्या ९७व्या वार्षिक बैठकीत सादर केलेल्या या संशोधनानुसार, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कांदा हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी फायबर युक्त कांद्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कांद्यामध्ये क्रोमियम असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल सहज काढून टाकेल ‘हे’ फळ; कधी आणि कसे खावे जाणून घ्या)

कांद्याचे फायदे

कांद्यामधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील जळजळ दूर करतात. ते ट्रायग्लिसराइड्स कमी करून कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात देखील मदत करतात. कांद्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कांद्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.

कांद्यामध्ये असलेले बायोटिन त्वचेला निरोगी ठेवते. जर कांद्याचा रस काढल्यानंतर त्याचा वापर केला तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याचे सेवन संधिरोग यासारख्या परिस्थिती सुधारण्यासाठी प्रभावी आहे. कांद्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे निरोगी आणि नियमित पचनसंस्था राखण्यासाठी चांगले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 10:54 IST

संबंधित बातम्या