Onion Cry Solution: कांदा हा असा एक पदार्थ आहे जो दररोज स्वयंपाकघरात वापरला जातो. तो भाजीची चव वाढवण्यात जेवढा अव्वल आहे तेवढा आपल्याला रडवण्यातदेखील. अशा परिस्थितीत, आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही कितीही कांदा कापला तरी तुमच्या डोळ्यातून एकही अश्रू येणार नाही.
कांदा कापताना आपण का रडतो?
जेव्हा तुम्ही कांदा कापता तेव्हा त्याच्या पेशी तुटतात. या पेशींमध्ये असलेले एक एंजाइम आणि सल्फरयुक्त संयुगे एकमेकांशी एकत्र येतात. जेव्हा हे मिश्रण होते तेव्हा प्रोपेनेथियल-S-ऑक्साइड नावाचा वायू तयार होतो. हा वायू हवेत उडतो आणि तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि डोळ्यांतील ओलाव्याशी प्रतिक्रिया करून सौम्य आम्ल तयार करतो. हे आम्ल तुमच्या डोळ्यांमध्ये जातं आणि डोळे झोंबतात. आणि म्हणून डोळ्यातून पाणी येऊ लागतं.
कांदे कापण्यापूर्वी ते फ्रीजमध्ये ठेवा
कांदे कापण्यापूर्वी, ते १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड तापमानात, एंजाइमची क्रिया कमी होते, ज्यामुळे कमी वायू बाहेर पडतो.
पाण्यात कांदे चिरून घ्या
एक मोठे भांडे घ्या आणि त्यात पाणी भरा. कांदा पाण्यात बुडवून तो कापून घ्या. यामुळे वायू पाण्यात विरघळेल आणि तो डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही.
कांदा मध्येच कापल्यानंतर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस लावा
कापलेल्या भागावर थोडासा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस लावा, यामुळे आम्ल वायू निर्माण करणारी रासायनिक प्रक्रिया मंदावते.
तोंडात पाणी ठेवा
कांदा कापताना तोंडात थोडे पाणी ठेवा, यामुळे श्वास घेताना वायू नाकाऐवजी तोंडातून जाईल आणि डोळ्यांपर्यंत कमी पोहोचेल.
चष्मा घाला
आजकाल बाजारात ऑनियन गॉगल्स देखील उपलब्ध आहेत. ते डोळ्यांपर्यंत वायू पोहोचण्यापासून रोखण्यास मदत करतात. जर हे उपलब्ध नसतील तर तुम्ही स्विमिंग गॉगल्स देखील वापरू शकता.
स्वयंपाकघरातील वेंटिलेशन चांगले ठेवा
पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा जेणेकरून गॅस डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. शक्य असल्यास, खिडकीजवळ किंवा मोकळ्या जागेत कांदा कापून घ्या.
अतिरिक्त टिप्स
कांदे सोलताना, वरचा आणि खालचा भाग कापणे टाळा, कारण येथे सर्वात जास्त वायू निर्माण करणारी रसायने असतात. कांदे कापल्यानंतर, वास काढून टाकण्यासाठी साबण आणि लिंबूने हात धुवा. कांद्याशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे, परंतु ते कापणे प्रत्येकासाठी सोपे नाही. तथापि, जर तुम्ही वरील सोप्या पण प्रभावी पद्धतींचे पालन केले तर कांदा कापणे आता भयानक किंवा ‘अश्रू आणणारे’ काम राहणार नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कांदा कापण्यासाठी स्वयंपाकघरात जाल तेव्हा या टिप्स फॉलो करा आणि अश्रूंशिवाय चवीचा आनंद घ्या…