Onion juice for Dandruff: बदलते हवामान, धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या केसांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतूत आपण सर्वांनाच कोंडयाचा त्रास होतो. यामुळे आपले केस निर्जीव दिसू लागतात आणि कमकुवत होऊन तुटायला लागतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने वापरता जी तुमच्या केसांसाठी आणखी हानिकारक असतात. चला तर मग जाणून घेऊया कांद्याचा रस कोंडा दूर करण्यासाठी आणि केस सुंदर ठेवण्यासाठी कसे वापरावे.

कोंड्याच्या समस्येसाठी कांदा केसांवर कसा वापरावा

  • एका भांड्यात कांदा बारीक करून त्याचा रस काढा.
  • स्वच्छ आणि धुतलेल्या केसांचे वेगळे विभाजन करा.
  • कांद्याच्या रसात एक कापसाचा बोळा बुडवा, कापसाचा बोळा संपूर्ण टाळूवर हळू हळू फिरवाआणि काही मिनिटे कोरडे होऊ द्या.
  • सौम्य शँम्पू आणि कंडिशनरने केस धुवा.
  • धुतल्यानंतर आवश्यक तेलाचे काही थेंब घेऊन केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांमधला कांद्याच्या रसाचा वास नाहीसा होईल.

हेही वाचा – तुम्हाला बटाटा भजी, फ्रेंच फ्राईज खायला आवडतात का? रोज बटाटा खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

कांद्याचा रस कसा उपयुक्त आहे?
केस गळणे थांबवते
असे म्हटले जाते की, कांद्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात आढळते जे केसांचे पोषण करण्यास मदत करते. तसेच, केस गळणे थांबवते आणि ते मजबूत बनवते. याशिवाय, हे आपले निर्जीव आणि कोरडे केस मऊ आणि रेशमी बनवते.

टाळूचे रक्ताभिसरण सुधारते
केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी शुद्ध कांद्याचा रस अतिशय उपयुक्त मानला जातो. हे केसांच्या कूपांना उत्तेजित करण्यास मदत करते. तसेच, केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण सुधारून, ते केस निरोगी बनवते आणि वाढीस प्रोत्साहन देते.

हेही वाचा – दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, तुम्हालाही असे वाटते का? मग समज चुकीचा असू शकतो, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

केसांचे नुकसान टाळते
कांद्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे केस खराब होण्यापासून बचाव करतात. कांद्याचा रस नियमितपणे केसांना लावल्यास केसांतून कोंड्याची समस्याही निघून जाईल आणि केस मजबूत होतील.