सध्या ऑनलाइन बँकिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोक हमखास ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतात. यासाठी IFSC कोड आवश्यक आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा IFSC कोड टाकला तर काय होईल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IFSC कोडचे फुल फॉर्म इंडियन फाइनेंशियल सिस्टम कोड आहे. हा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे नियुक्त केलेला ११ अंकी अल्फा-न्यूमेरिक कोड आहे. हा कोड प्रत्येक बँकेच्या शाखेला दिला जातो, म्हणजेच प्रत्येक शाखेला एक अद्वितीय IFSC कोड असतो. IFSC चा वापर NEFT, IMPS आणि RTGS सारख्या ऑनलाइन बँकिंगमध्ये केला जातो. एक वैध IFSC शिवाय, इंटरनेट बँकिंग किंवा फंड ट्रांसफर करू शकत नाही. या ११ अंकी कोडमधील पहिले ४ अंक बँकेचे प्रतिनिधित्व करतात. यानंतरचा अंक ० आहे, जो भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवला जातो. यानंतर शाखेचे शेवटचे ६ अंक ओळखले जातात.

( हे ही वाचा: एअरटेलने २० टक्क्यांनी दरात केली वाढ; ‘आर्थिक आरोग्यासाठी’ निर्णय! )

चुकीचा IFSC कोड टाकला तरीही व्यवहार होतो का?

ऑनलाइन व्यवहारातील एक चूक सर्व काही बिघडू शकते. त्यामुळे व्यवहार करताना IFSC कोड भरण्याच्या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुमचे खाते SBI बँकेच्या दिल्ली शाखेत असेल, परंतु पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करताना, तुम्ही नोएडा येथील SBI शाखेचा IFSC कोड टाकला असेल, तर व्यवहार होईल आणि तुमचे पैसे कापले जातील.जरी कोडच्या अक्षरात हेराफेरी केली गेली असेल परंतु खाते क्रमांक किंवा इतर तपशील बरोबर असतील तर तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातील, कारण मुख्यतः बँका खाते क्रमांक पाहतात.

( हे ही वाचा: December Horoscope: डिसेंबरमध्ये ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ; होणार प्रगती! )

तुम्ही दुसऱ्या बँकेचा IFSC कोड टाकल्यास काय होईल?

जर IFSC कोडमध्ये चूक असेल, म्हणजे SBI गाझियाबाद ऐवजी PNB गाझियाबादचा कोड टाकला असेल, तर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. तथापि, हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा PNB ग्राहकाकडे तुम्ही SBI मध्ये प्रविष्ट केलेला खाते क्रमांक समान असेल. अशी शक्यता कमी आहे, जर अशी जुळणी झाली नाही, तर तुमचा व्यवहार रद्द केला जाईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online transaction what happens if i enter incorrect ifsc code during online transaction find out ttg
First published on: 22-11-2021 at 10:49 IST