ट्रिपल कॅमेरा, मोठा डिस्प्ले; ‘ओप्पो’चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Oppo A15s चा आज पहिला सेल

डिस्काउंटसह 10 हजार 600 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आणि अन्य आकर्षक ऑफर्सही

Oppo कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A15s आज (21 डिसेंबर) सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीने हा फोन भारतात लाँच केलाय. ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर फ्लॅश सेलमध्ये हा फोन खरेदी करता येईल.

कंपनीने Oppo A15s केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच केलाय. 11 हजार 490 रुपये इतकी या फोनची किंमत असून ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या खरेदीवर आकर्षक ऑफरही आहेत.  Oppo A15s हा फोन भारतात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 10% डिस्काउंट मिळेल. याशिवाय, 10 हजार 600 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही मिळू शकते. तसेच, नो-कॉस्ट EMI चा पर्यायही आहे.

आणखी वाचा- 5000mAh बॅटरी आणि चार कॅमेऱ्यांचा सेटअप, सेलमध्ये फक्त 6,999 रुपयांत खरेदी करा ‘बजेट’ स्मार्टफोन

डायनॅमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि रेन्बो सिल्वर अशा तीन कलरच्या पर्यायांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. ओप्पो A15s मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ IPS LCD डिस्प्ले असून Mediatek Helio P35 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 4230mAh क्षमतेची बॅटरी असून ColorOS 7.2 वर कार्यरत असणाऱ्या अँड्रॉइड 10 वर आधारित या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आणि 2-2 मेगापिक्सेलचे मॅक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. नाइट मोड, टाइम लॅप्स, स्लो-मोशन आणि AI ब्युटिफिकेशनचा पर्यायही कॅमेऱ्यात मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wifi, ब्लुटूथ, जीपीएसचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Oppo a15s first sale begins in india starting from today 21st dec check price and other details sas