Oppo A53 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

‘ओप्पो’ने आपल्या A सीरिजअंतर्गत आणला जबरदस्त स्मार्टफोन

ओप्पो कंपनीने आपल्या A सीरिजअंतर्गत भारतात एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लाँच केला आहे. नवीन Oppo A53 स्मार्टफोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ग्रेडिअंट बॅकपॅनल डिझाइनसोबत येतो. Oppo A53 हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, ऑक्टा-कोर प्रोसेसर, रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि 18 W फास्ट चार्जिंगसह दमदार बॅटरी यांसारखे शानदार फीचर्स आहेत. Oppo च्या या लेटेस्ट स्मार्टफोनची रिअलमी 6, सॅमसंग गॅलेक्सी M31 आणि रेडमी नोट 9 प्रो यांसारख्या स्मार्टफोनसोबत टक्कर असेल.

Oppo A53 2020 किंमत :-
Oppo A53 स्मार्टफोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये आला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 490 रुपये आहे. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक, फेअरी व्हाइट आणि फॅन्सी ब्लू अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

आणखी वाचा- पाच कॅमेऱ्यांचा Infinix Hot 9 Pro खरेदीची संधी, सेलमध्ये मिळतील आकर्षक ऑफरही

Oppo A53 स्पेसिफिकेशन्स :-
Oppo A53 2020 अँड्रॉइड 10 वर आधारित कलर ओएस 7.2 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5-इंच एचडी+ (1,600×720 पिक्सल) डिस्प्ले (90 Hz रिफ्रेश रेट) आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर असून 4 जीबी व 6 जीबी रॅमचे दोन पर्याय मिळतील. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (16MP + 2MP + 2MP) आहे. याशिवाय सेल्फीसाठी पुढील बाजूला एक 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा होल-पंच अटआउटच्या आतमध्ये सेट करण्यात आला आहे. Oppo A53 मध्ये 64 जीबी/ 128 जीबी स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तर, फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Oppo a53 2020 launched in india check price specifications and other details sas