चीनला पहिला झटका, ‘ओप्पो’ला रद्द करावा लागला फोनचा लाइव्ह लाँच इव्हेंट

देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीचा परिणाम…

(संग्रहित छायाचित्र)

चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट रद्द केला. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन Oppo Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली. लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला याबाबत वृत्तसंस्था Reuters ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Oppo Find X2 स्मार्टफोन गुरुवारी संध्याकाळी लाँच केला जाणार होता. कंपनीकडून हा डिव्हाइस संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये लाँच केला जाणार होता. या कार्यक्रमाची लाइव्ह स्ट्रीमिंग YouTube वर होणार होती. पण ही YouTube लिंक नंतर गायब झाली आणि लाइव्ह लाँचिंग रद्द झालं. लाइव्ह लाँचिंगऐवजी कंपनीने 20 मिनिटांचा एक प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन फोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये भारतात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओप्पोने कशाप्रकारे मदत केली हे दखील कंपनीने दाखवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Oppo cancels live online phone launch in india amid calls to boycott chinese goods sas

ताज्या बातम्या