ओप्पो कंपनीचा Oppo K3 हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज(दि.30) संधी आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसारखी फीचर्स असलेला हा फोन दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असेल. 6GB RAM + 64GB आणि 8GB RAM + 128GB अशा दोन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची Redmi K20, Samsung Galaxy M40, आणि Vivo V15 यांसारख्या फोनशी स्पर्धा आहे. या फोनमध्ये Game Boost 2.0 आणि VOOC फ्लॅश चार्ज 3.0 यांसारखे प्री-लोडेड फीचर्स आहेत.

किंमत आणि ऑफर्स-
6GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 990 रुपये तर 8GB रॅम व्हेरिअंटची किंमत 19,990 रुपये आहे. हा फोन अॅरॉरा ब्ल्यू आणि जेड ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. अॅमेझॉन पे द्वारे पेमेंट केल्यास 1,000 रुपये कॅशबॅकचाही फायदा मिळू शकतो. अॅक्सिस बँकेच्या कार्डवर 1000 रुपये इंस्टंट डिस्काउंटची ऑफर देखील आहे. याशिवाय रिलायंस जिओकडून या फोनच्या खरेदीवर 7,050 रुपयांचे व्हाउचर दिले जात आहेत. तसंच हा फोन नो कॉस्ट इएमआयवर देखील उपलब्ध असेल.

Oppo K3 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर असून अँड्रॉइड 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल. 3,765 mAh क्षमतेची बॅटरी फोनमध्ये देण्यात आली आहे. ही बॅटरी स्वतःच्या VOOC 3.0 फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा मोटोराइज्ड पॉप-अप कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्ल्यू-टूथ, जीपीएस/ ए-जीपीएस आणि युएसबीचा पर्याय आहे.