scorecardresearch

मानसिक विकारांमुळे मुखारोग्यावर परिणाम

मानसिक रुग्णांवर जे औषधोपचार केले जातात त्यामुळेही त्यांच्या मुखारोग्यावर दुष्परिणाम होतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

लंडन :  चुकीच्या खाद्यसवयी, अपुरी किंवा अनियमित दंतसफाई असे आपल्या मुखारोग्यावर दुष्परिणाम करणारे अनेक घटक आहेत. याबरोबरच आपल्या दंत आरोग्यावर आपले मानसिक आरोग्यही प्रभाव टाकत असते. ताण, चिंता आणि अत्यंतिक निराशेचा सामना करणाऱ्यांना अनेक कारणांमुळे दंतविकारांचा सामना करावा लागू शकतो, हे नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

‘ब्रिटिश सोसायटी ऑफ पेरिओडोंटोलॉजी’च्या पाहणीनुसार मानसिक आरोग्य आणि दंतविकारांच्या परस्परसंबंधात ताण-तणाव हा घटक महत्त्वाचा ठरतो. तणावग्रस्त रुग्ण अतिधूम्रपान करतात. त्यांच्या मुखारोग्याकडे दुर्लक्ष करतात.  तसेच दंतवैद्यांकडे नियमित तपासणी किंवा उपचारांसाठी जाणे टाळतात. त्यामुळे त्यांना विविध दंतविकारांना तोंड द्यावे लागते. ताणामुळे अशा रुग्णांना दात खाण्याचीही सवय जडते. त्यामुळे जबडा दुखण्याचे विकार त्यांना जडतात.

औषधोपचारांमुळेही..

मानसिक रुग्णांवर जे औषधोपचार केले जातात त्यामुळेही त्यांच्या मुखारोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यांच्यामुळे तोंडात कोरडेपणाचा विकार होतो ज्याला झरोस्टोमियाह्ण असेही म्हणतात.  निराशेवरील औषधांच्या सेवनाने अशा रुग्णांत लाळ तयार होण्याचे प्रमाण ५८ टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे मुखारोग्य धोक्यात येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oral health issues in people with mental disorders zws

ताज्या बातम्या