scorecardresearch

लहान मुले आणि तरुणांमध्ये दात किडण्याची समस्या वाढली आहे, ‘या’ ३ उपायांनी दातांचे करा रक्षण

दातांच्या देखभालीकडे फार कमी लक्ष दिले जाते, ज्यामुळे दात किडण्याची समस्या उद्भवते.

lifestyle
दात स्वच्छ करण्यासाठी आपण बॅटरीवर चालणारे ब्रश वापरावे.(photo: freepik)

आरोग्याचा महत्त्वाचा भाग असूनही अनेक लोकं दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. दिवसातून दोनदा नियमितपणे ब्रश करून आपण आपले दात निरोगी ठेवू शकतो पण बरेच लोक त्याकडे लक्षही देत ​​नाहीत. मात्र आपण हे विसरतो की आपले संपूर्ण आरोग्य आपल्या दातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. आजकाल लहान मुलांपासून तरूणांमध्ये दात किडण्याची समस्या सामान्य झाली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, चॉकलेट इत्यादींमुळे दात सडण्याची समस्या अधिक गंभीर बनू शकते. यावेळी डेन्टल स्पेशलिस्ट दीक्षा बत्रा यांनी दात निरोगी ठेवण्यासाठी दातांच्या पोकळीपासून बचाव करण्याचे ३ मार्ग सांगितले आहेत.

दात स्वच्छ करण्याची काळजी घ्या

डॉ बत्रा यांनी यावेळी संगितले की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण अन्न पदार्थ खाताना दातांचा वापर करतो. पण जेव्हा ते स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा आपण दोन मिनिटे ब्रश करायला फारच कमी वेळ आपण देतो. दातांच्या देखभालीकडे फार कमी लक्ष दिले जाते, ज्यामुळे दात किडण्याची समस्या उद्भवते. दात स्वच्छ करण्यासाठी आपण बॅटरीवर चालणारे ब्रश वापरावे. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रश वापरा. टूथपेस्ट अशी असावी की आपल्या दातांबरोबरच हिरड्याही मजबूत होतील. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही टूथपेस्टची निवड करावी. प्रत्येक ब्रश नंतर जीभ क्लीनरने जीभ स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे.

फ्लोराईड टूथपेस्ट आणि माउथवॉश वापरा

डॉ बत्रा यांनी संगितले की, टूथपेस्ट निवडताना लक्षात ठेवा की त्यात फ्लोराईडचे प्रमाण असावे. त्याचप्रमाणे माउथवॉश वापरताना लक्षात ठेवा की त्यात फ्लोराईडचे प्रमाण आहे की नाही. हे दात किडण्यापासून वाचवते आणि दात लवकर तुटण्यापासून वाचवते.

दातांवर कोणत्याही प्रकारचे थर बसू देऊ नका

काही खाल्ल्यानंतर, जेव्हा तुम्ही दात नीट स्वच्छ करत नाही, तेव्हा तुम्ही खललेल्या अन्नाचा कण त्या दातात अडकून राहतो. त्यात या अडकलेल्या भागात बॅक्टीरिया वाढतात आणि आम्ल तयार करतात आणि दातांच्या मुलामा वर एक थर तयार करतात. अशाने दात किडण्याला सुरुवात होते. त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ करा आणि सकाळसोबतच रात्री झोपताना देखील ब्रश करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-10-2021 at 18:53 IST
ताज्या बातम्या