Home Remedies On Crack Heels: जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपल्या त्वचेवर थेट परिणाम दिसून येतो. अशावेळी अनेक जण आपल्या चेहऱ्याची तर पुरेपूर काळजी घेतात पण पायांकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा पावसाळा संपून हिवाळा सुरु होतो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यातच पायांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे अन्यथा थंडीत पायाच्या तळव्याला भेगा पडून पाय दुखणे, इन्फेक्शन असे त्रास उद्भवू शकतात. विशेषतः जर पायाच्या भेगांमुळे त्यात माती अडकून राहते व संसर्ग वाढण्याचा धोका असतो. यामुळेच थंडीत अनेकजण पाय दुखत असल्याची तक्रार करतात. आपणही असा त्रास अनुभवला असेल तर यावेळी थंडीच्या आधीच हे काही घरगुती उपाय वापरायला सुरु करा.

पायाला भेगा का पडतात हे तुम्हाला माहीत आहेत का?

अनेकांना वाटत असेल की फार वेळ पाण्यात राहिल्याने पायाला भेगा पडतात पण त्यामागे एक गंभीर कारण आहे हे समजून घ्या. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा शरीर आपल्याला संकेत देत असतं, यातीलच एक प्रकार म्हणजे पायाला भेगा पडणे. शरीरातील हार्मोन्समुळे सुद्धा पायाच्या भेगा पाडण्याचे प्रमाण वाढते. हार्मोन्स व व्हिटॅमिन्समुळे त्वचेची आर्द्रता कमी होते त्यामुळे त्वचा रुक्ष होते. पायाला भेगा पडल्याने टाचेतुन रक्त येऊ लागते. व्हिटॅमिन बी3, ई, च्या कमतरतेमुळे केवळ पायच नव्हे तर शरीरावरील एकूणच त्वचा रुक्ष होते, यामुळे त्वचा फाटण्याचाही धोका असतो.

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल

टाचांना भेगा पडू नयेत यासाठी उपाय

  • आपल्या पायाच्या टाचा या इतर शरीरापेक्षा सर्वाधिक रुक्ष असतात त्यामुळे त्यांना वेळोवेळी मॉइश्चरायजर लावा.
  • आठवड्यातून एकदा काही २० मिनिटांसाठी पाय कोमट पाण्यात ठेवा.
  • पाण्याने टाच मऊ होते व तेव्हा रुक्ष त्वचा आपण स्क्रब करून काढू शकता.
  • आहारात ड्राय फ्रुट्सचा समावेश करा
  • रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ असल्याची खात्री करा.
  • थंडीत मोजे घालून झोपणे फायद्याचे ठरते.

टाचांना भेगा पडल्यास करा हे घरगुती उपाय

१) व्हिटॅमिन ई ऑइल व कॅप्सूल

एनसीबीआई (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इनफार्मेशन) वर प्रकाशित पबमेड (PubMed. Gov)च्या एका संशोधनात सांगण्यात आले आहे की, व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी लाभदायक असते. तुम्हाला जखमा झाल्या असतील तर व्हिटॅमिन ई चा वापर गुणकारी ठरू शकतो. व्हिटॅमिन ईह्या कॅप्सूल किंवा तेलाने टाचांना दिवसातून दोन वेळा मसाज केल्यास तुम्हालाही फरक दिसून येईल. यातील अँटी इन्फ्लेमेंटरी व हायड्रेटिंग गुणांमुळे त्वचेची सूज कमी होते तसेच त्वचा मऊ राहते.

२) तांदळाचे पीठ

पबमेडच्या संशोधनातच टाचांच्या भेगांवर आणखी एक उपाय सांगण्यात आला आहे आणि तो म्हणजे तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठाचा फेसपॅक आपण ऐकून असाल याच प्रमाणे पिठात थोडा लिंबाचा रस व मध टाकून आपण पायांसाठी पॅक बनवू शकता. आठवड्यात एकदा पाय कोमट पाण्यात ठेवल्यावर त्यानंतर हा पॅक लावून आपण घरीच पेडिक्युअर करू शकता.

हाडांमधून कडाकडा मोडल्याचा आवाज येतोय? ‘या’ पदार्थांच्या सेवनाने सांधेदुखीवर मिळेल आराम

३) तिळाचे तेल

तिळाच्या तेलात अनेक पोषक तत्व असतात, विशेषतः थंडीत तिळाच्या तेलाची मालिश केल्यास त्वचा रुक्ष होण्यापासून वाचते. रोज रात्री थोडं हलकं कोमट तेल पायाच्या तळव्यांना लावून झोपू शकता.