नियोजन आहाराचे : पंचकर्मे २०२१

पंचकमाचा चिकित्सा म्हणून उपयोग न करता केवळ जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी रुग्णाला मोठ्यात मोठे पॅकेज घ्यायला भाग पडले जाते.

– डॉ. अरुणा टिळक

गेले वर्षभर आपण पंचकर्मे म्हणजे काय, ते कोणी करावे कोणी करू नये हे २४ लेखांतून पहिले. आज आपण पंचकर्माची सद्य:स्थिती काय आहे, ते करताना येणारे प्रश्न याबद्दल माहिती घेऊ.

पंचकर्म केंद्रांचा उपद्रव गेल्या २० वर्षांत अनेक मोठमोठे बाबा, स्वामी, गुरू यांच्या व्याख्यानांमधून, वृत्तपत्रांतून येणाऱ्या आरोग्यविषयक पुरवणींमधून आयुर्वेद-पंचकर्म यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार-प्रचार झाला. केरळीय पंचकर्मे या विषयीची उत्सुकता याचा फायदा अनेक व्यावसायिक मंडळींनी पंचकर्म केंद्र उघडून घेतला. यामध्ये अनेक ठिकाणी पंचकर्माच्या नावाखाली मसाज सेंटर चालवले जाते. काही ठिकाणी तज्ज्ञ वैद्यांच्या अनुपस्थितीत केवळ परिचारकांकडून उपचार करवले जातात.

’ पंचकमाचा चिकित्सा म्हणून उपयोग न करता केवळ जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी रुग्णाला मोठ्यात मोठे पॅकेज घ्यायला भाग पडले जाते. यामुळे रुग्णांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान तर होतेच, पण त्यांचे आयुर्वेद व पंचकर्मे यांबद्दलचे त्यांचे मतही कलुषित होते.

’ याशिवाय अनेक ठिकाणी दोन दिवसांत, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पंचकर्मे केली जातात. यावर उत्तम उपाय म्हणजे कोणत्याही ठिकाणी पंचकर्मे करण्याआधी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

’ ज्या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा केली जाते, जेथे वैद्य तुमचे आरोग्यविषयक समस्यांचे समाधानकारक निराकरण करतील अशा क्लिनिकमध्ये पंचकर्मे करावीत.

’ पंचकर्मे करण्यासाठी वैद्यांकडे जा. कोणत्याही केंद्राला भुलू नका.

’ पंचकर्मे करण्यासाठी आवश्यक तो वेळ व पथ्य पाळण्याची तयारी असेल तरच पंचकर्मे करा.

’ काही विमा कंपन्या हल्ली पंचकर्म उपचारांसाठी परतावा देत आहेत त्यादृष्टीने विमा घेताना आपण तशी विचारणा करू शकता.

’ करोनाच्या पार्श्वभूमीवर नस्य, वमन असे पंचकर्म उपचार पुढील काळात वरदान ठरणार आहेत.

arunatilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Panchakarma of planning diet akp