Paneer vs Soya Chunks Protein: वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या प्रोटीनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा दोन्हा घटकांचा आहारात समावेश केला जातो. मात्र, जेव्हा कमी बजेटमध्ये अधिक प्रोटीन मिळवण्याचा विचार केला जातो तेव्हा दोघांपैकी कोणते योग्य आहे? यासाठी १०० ग्रॅम पनीर किंवा सोयामध्ये किती प्रोटीन आहेत हे पाहणे पुरेसे नाही. ५० रूपये खर्च करून दोन्हीची किती रक्कम मिळते आणि त्यातून तुम्हाला किती प्रोटीन मिळेल हे पाहणं गरजेचं आहे.

पनीरमध्ये किती प्रोटीन असते?

पनीर दुधापासून बनवलेले असते आणि त्यात प्रोटीन तसंच कॅल्शियमही असते. १०० ग्रॅम पूर्ण फॅटी पनीरमध्ये साधारण १८ ते २० ग्रॅम प्रोटीन असू शकते. तसंच पनीरच्या प्रकारानुसार आणि ते तयार करण्याच्या पद्धतीनुसार हे प्रमाण बदलू शकते.

जर पनीर ४०० रूपये प्रति किलोने मिळत असेल तर ५० रूपयांच सुमारे १२५ ग्रॅम पनीर मिळेल. हे पनीर सुमारे २३ ते २५ ग्रॅम प्रोटीन देऊ शकते.

सोयाबीनमध्ये किती प्रोटीन असते?

कमी बजेटमध्ये प्रोटीन मिळवण्यासाठी सोया चंक्स हादेखील चांगला पर्याय आहे. १०० ग्रॅम वाळलेल्या सोया चंक्समध्ये सुमारे ५० ते ५२ ग्रॅम प्रोटीन असू शकते. हे पनीरपेक्षा जास्त आहे.

सोया चंक्सची किंमत १४० रूपये प्रति किलो मानली तर सुमारे ३५७ ग्रॅम सुक्या सोया चंक्समध्ये ५० रूपयांना मिळू शकते. त्यामध्ये एकूण सुमारे १८० ग्रॅम प्रोटीन असू शकते. मात्र एकाच वेळी एवढ्या प्रमाणात प्रोटीन खाण्याचा सल्ला दिला जात नाही. भिजवल्यावर आणि शिजवल्यावर तुकड्यांचे वजन वाढते, मात्र पाणी टाकल्यावर प्रोटीनचे एकूण प्रमाण वाढत नाही.

५० रूपयांचं प्रोटीन

सोया चंक्स कमी किमतीत पनीरपेक्षा जास्त प्रोटीन देतात. अंदाजे किमतीनुसार, ५० रूपयांमध्ये पनीरमध्ये सुमारे २३ े २५ ग्रॅम प्रोटीन मिळतील, तर ५० रूपयांच्या सुक्या सोया चंक्समध्ये सुमारे १८० ग्रॅम प्रोटीन असू शकतात. तसंच सोया चंक्सची संपूर्ण मात्रा एकाच वेळी खाण्याऐवजी अनेक जेवणां वापरली जाते.

वजन कमी करण्यासाठी कोणते चांगले?

जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर केवळ प्रोटीनच नव्हे तर एकूण कॅलरी आणि फॅटकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. पूर्ण फॅटी पनीरमध्ये चरबी आणि कॅलरी जास्त असू शकतात, तर सोया चंक्समध्ये फॅट कमी आणि प्रोटीन जास्त असते. कमी कॅलरीमध्ये अधिक प्रोटीन मिळवण्यासाठी सोया चंक्स चांगला पर्याय आहे.

मात्र पनीर आहारातून काढायची गरज नाही. भूक आणि रोजच्या आहारानुसार, सोया आणि पनीर दोन्हीचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

पनीर खाणं सोडावं का?

नाही, पनीर आणि सोया चंक्स या दोन्हीचे फायदे आहेत. या दोन्ही आलटून पालटून खाऊ शकता.