मांसाहार केल्यानंतर पपई खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

जाणून घ्या, पपई खाण्याचे फायदे

सर्वाधिक खालल्या जाणाऱ्या फळांमध्ये पपईचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत हे साऱ्यांनाच ठावूक आहे. विशेष म्हणजे पिकलेली पपई खाण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच कच्ची पपई खाण्याचेदेखील आहेत. पपईमध्ये प्रथिने, खनिजे, ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. पपई जशी पिकते तसं तिच्यामधलं ‘क’ जीवनसत्त्व वाढतं. त्यामुळे अनेकदा जेवण झाल्यावर पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मांसाहार केल्यानंतरदेखील पपई खाणे फायद्याचे असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे पपई खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊ.

१. मांसाहार हा पचायला जड असतो. त्यामुळे मांसाहार केल्यावर त्यावर पपई खावी. पपईमुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

२. तसंच भूक मंदावली असेल तर कच्च्या पपईची भाजी खाल्ल्यास पचनशक्ती वाढते.

३. पपईमधील ‘पेपेन’मुळे अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार दूर होतात.

४. पिकलेल्या पपईमध्ये फळशर्करा असते, जी रक्तामध्ये लगेच शोषली गेल्याने ऊर्जा आणि उत्साह वाढतो.

५. सौंदर्य वाढीसाठीही पपई फायदेशीर आहे.

६.कच्च्या पपईचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चकाकी येऊन पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.

७. त्वचा कोरडी आणि सुरकुतलेली असेल, उन्हामुळे त्वचेवर पुटकुळ्या आल्या असतील व त्यामुळे त्वचेची आग होत असेल तर पपईचा रस त्वचेवर लावावा यामुळे दाह नाहीसा होऊन त्वचा नितळ होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Papaya fruit benefits for skin and digestion system ssj

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या