नैराश्य हे कोणत्याही वयातील व्यक्तीला येऊ शकतं. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाची नैराश्याची पातळी आणि प्रकार वेगवेगळे असतात. यात वयस्क व्यक्ती किंवा एखादी तरुण व्यक्ती नैराश्यात गेली तर त्यावर ती स्वत: मात करुन या संकटातून बाहेर पडायचा प्रयत्न करुन शकते. मात्र अनेक वेळा लहान मुलंदेखील नैराश्यात जातात. परंतु त्यांना यातून बाहेर कसं पडावं याचं ज्ञान नसतं. त्यामुळे अशावेळी पालकांनी मुलांची मदत केली पाहिजे.

दरम्यान, सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. त्यामुळे पालकांच्याही मुलांकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात अनेक वेळा मुलांच्या बालमनावर परिणाम होत असतो.