scorecardresearch

मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी ‘या’ चुका कधीही करू नयेत

पालकत्वादरम्यान झालेल्या काही चुका त्वरीत दुरुस्त केल्या जाऊ शकतात, तर काही अशा आहेत ज्या तुमच्या मुलासाठी कायमस्वरूपी मानसिक समस्या निर्माण करू शकतात.

या चुका कोणत्या आहेत आणि त्या आपण कशा सुधारू शकतो हे जाणून घेऊया. (Photo : Pexels)

आजच्या व्यस्त जीवनशैलीतील लोकांसाठी पालकत्व ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असू शकते. जर गोष्टी योग्यरित्या केल्या नाहीत तर मुलाचे चांगले संगोपन करण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. या प्रक्रियेत पालकांची जबाबदारी मोठी असून मुलांच्या संगोपनात कोणताही निष्काळजीपणा नसावा, जेणेकरून मुलाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. पालकत्वादरम्यान झालेल्या काही चुका त्वरीत दुरुस्त केल्या जाऊ शकतात, तर काही अशा आहेत ज्या तुमच्या मुलासाठी कायमस्वरूपी मानसिक समस्या निर्माण करू शकतात. या चुका कोणत्या आहेत आणि त्या आपण कशा सुधारू शकतो हे जाणून घेऊया.

  • आज आपला समाज मुलांनी शाळेत चांगली कामगिरी करण्याचा आग्रह धरतो आणि केवळ काहीच करिअर क्षेत्रांना प्राधान्य देतो. हे आपल्याला पालकत्वाच्या संकुचित दृष्टिकोनाकडे घेऊन जाते, जिथे आपण आपल्या मुलांना. त्यांना काय करायचे ते निवडू देत नाही. अशा परिस्थितीत, नेहमीच तुलना केल्यामुळे, मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, मुलाला नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि तो ज्या क्षेत्रात प्रवेश घेतो त्या क्षेत्रातील रस गमावू शकतो.

तुमच्या मुलांचा हट्टी स्वभाव वाढू लागलाय? पालकांनो आजपासूनच फॉलो करा ‘या’ टिप्स

  • जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या स्वतः त्वरित सोडवता, तेव्हा मुलांमध्ये कोणतीही समस्या सोडवण्याची मानसिकता नीट विकसित होत नाही. परिणामी, मुले त्यांच्या पालकांवर जास्त अवलंबून असतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत. एक वेळ अशी येते की हुशार असूनही त्यांच्या भावनिक अपरिपक्वतेमुळे ते जीवनातील लहानसहान प्रश्न नीट सोडवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना स्वावलंबी होण्यासाठी शिकवणे अत्यंत गरजेचे आहे.
  • कधीकधी पालक आपल्या मुलांवर खूप नियंत्रण ठेवू लागतात. ते मुलांसाठी वेगवेगळ्या अटी ठेवतात आणि त्यांना कोणतीही गोष्ट, कोणताही खेळ निवडण्याचे किंवा आनंद घेण्याचे कोणतेही स्वातंत्र्य देत नाहीत. पालकांच्या या वागणुकीमुळे त्यांच्या मुलांना नियम मोडल्याबद्दल शिक्षा होते आणि या प्रक्रियेत मुले त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास गमावतात. त्यांच्यात नैराश्य येऊ लागते. अशा परिस्थितीत इतरांसोबतचा विश्वास आणि जवळीक वाढवणे अशा मुलांसाठी आव्हानात्मक होऊन जाते.
  • मुलांशी उत्तम संवाद साधणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून ते आपल्या भावना व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. परंतु जेव्हा ते असे करतात तेव्हा त्या भावना पूर्णपणे फेटाळून किंवा तुमच्या अनुभवांबद्दल बोलून त्यांना चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचे चांगले श्रोते व्हा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी त्यांना ओरडू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parents should never make these mistakes to keep their children mentally healthy pvp

ताज्या बातम्या