लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याआधी हे नक्की वाचा

लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताना काही ठराविक १०० हॅशटॅग फोटोंना वापरू नये यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्या लहान मुलांचे फोटो फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर अपलोड करणं अनेक पालकांना आवडतं. आपल्या चिमुकल्या बाळाचं कौतुक व्हावं, त्याचे गोंडस फोटो सोशल मीडियावरील आपल्या मित्रपरिवारानं पाहावेत असं अनेकांना वाटतं. त्यामुळे काही पालकांना आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा मोह अनावर होतो. पण, तुम्हीही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण असं करणं तुम्हाला कदाचित महागातही पडू शकतं.

वाचा : फेसबुकवर मित्रमंडळींना शोधणे झालं अवघड; हे फिचर झाले बंद

‘चाइल्ड रेस्क्यू कोअॅलिशन संस्थे’नं सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे. लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताना काही ठराविक १०० हॅशटॅग फोटोंना वापरू नये यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सोशल मीडियावर लहान मुलांचे जे फोटो अपलोड केले त्यावेळी वापरण्यात येणारे १०० हॅशटॅग धोकादायक असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे. गुन्हेगार या हॅशटॅगच्या मार्फत लहान मुलांच्या फोटोंचा शोध घेऊन त्याचा गैरवापर करतात असं संस्थेच्या संशोधनातून समोर आलं आहे. #BathTime, #NakedKids, #ToiletTraining यांसारख्या १०० हॅशटॅशचा वापर पालकांनी आवर्जून टाळावा यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

वाचा : समजून घ्या! पौगंडावस्थेतील आहाराच्या गरजा

काही महिन्यांपासून ते वय वर्षे तीन वयोगटातील ९० टक्के लहान मुलांचे फोटो आजकाल सोशल मीडियावर उपलब्ध असतात. हे फोटो काही गुन्हेगार डाऊनलोड करतात, त्याचा गैरवापर करतात किंवा अन्य वेबसाईट्वर अपलोड करत असल्याचं समोर आलं. मुलाचं वय पाच वर्ष होईपर्यंत बहुतांश पालकांनी त्याचे शेकडो फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले असतात. यात आंघोळ करतानाचे किंवा बाळांच्या नग्न फोटोंचाही समावेश असतो. मुलं जसं जसं मोठं होत जातं तसे हेच फोटो त्याला मानसिक त्रास व्हायला कारणीभूत ठरू शकतात ही बाब उदाहरणासह संस्थेनं पालकांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Parents should not use these hashtags on photos of young children

ताज्या बातम्या