एक ‘पाककला’ जी तुम्हाला जिंकून देऊ शकते कुटुंबासह ‘गोवा ट्रिप’

कदाचित ही स्पर्धा तुमच्या रेसिपीला जगभरात दाद मिळवून देणारी किल्ली ठरू शकेल

तुमच्याकडेही अफलातून पाककृती असतील तर क्षणाचाही विलंब न करता तयारीला लागा.

काही खानसाम्यांच्या हाताला अशी चव असते की अगदी साधा वाटणारा खाद्यपदार्थही त्यांच्या कृतीतून अगदी वेगळाच बनतो आणि ती चव त्या शेफची ओळख ठरते. अशा चविष्ट पाककृती केवळ खवय्यांचं लक्षच वेधत नाहीत, तर चवीनं मनही तृप्त करतात. एखादा अत्यंत चविष्ट व खवय्यांना मोहात पाडेल असा न विसरता येणारा पदार्थ तुम्ही बनवू शकत असाल आणि तो तमाम भारतीयांनी चाखायला हवा असेल तर पाककला स्पर्धा हे तुमच्यासाठी योग्य व्यासपीठ आहे!

ऑनलाइन रेसिपी काँटेस्टच्या माध्यमातून लोकसत्ता तुमच्यासाठी अशी एक संधी आणत आहे, जी तुमची पाककृती जगभरातल्या खवय्यांपर्यंत पोचवेल. चांगल्या पाककृती व गुणी शेफना दर आठवड्याला आकर्षक भेटवस्तू मिळतील. इतकंच नाही तर भाग्यवान विजेत्याला कुटुंबासह गोव्यामध्ये सुट्टी साजरा करता येणार आहे, ती ही संपूर्णपणे मोफत!

प्रेस्टिज सहप्रायोजक असलेल्या पाककला स्पर्धेचे ग्रेटर बँक गोल्ड लोन हे बँकिंग पार्टनर आहेत. कदाचित ही स्पर्धा तुमच्या रेसिपीला जगभरात दाद मिळवून देणारी किल्ली ठरू शकेल. मग वाट कसली बघता? पाककला स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमच्यातल्या पाककलेच्या कौशल्याला वाव द्या! सहभागासाठी भेट द्या: indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Participate in loksatta paakkala contest and win exciting prizes

ताज्या बातम्या