यूरिक ऍसिड हा एक आजार आहे जो अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे विकसित होतो. जेव्हा युरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यामध्ये तयार होऊ लागतात आणि आपले शरीर हे टाकाऊ पदार्थ काढू शकत नाही तेव्हा युरिक ऍसिड धोकादायक अवस्थेत पोहोचते. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की मग गाउटचा आजार सुरू होतो. संधिरोग रुग्णांसाठी खूप वेदनादायक आहे. संधिरोगाच्या बाबतीत रुग्णाच्या सांध्यामध्ये जास्त वेदना आणि सूज असते.

शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याची अनेक कारणे आहेत, जसे की जास्त प्रथिने घेणे, वेळेवर न खाणे, शारीरिक हालचाली कमी करणे आणि विशिष्ट मिश्रणाच्या औषधांचा दीर्घकाळ वापर करणे ही यूरिक अॅसिड वाढण्याची कारणे आहेत. शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रित करून गाउटचा धोका टाळता येतो.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवण्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे. आहारातील काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही युरिक अॅसिड नियंत्रित करू शकता. पडवळ ही अशीच एक भाजी आहे जी युरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने युरिक ऍसिडची पातळी वेगाने नियंत्रित केली जाऊ शकते.

पडवळ यूरिक ऍसिड कसे नियंत्रित करते

पडवळाची भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि आरोग्यालाही फायदा होतो. पडवळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २ आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध पडवळाच्या सेवनाने युरिक अॅसिड नियंत्रणात राहते. वाढलेले यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी पडवळाची भाजी खूप प्रभावी आहे. अशा काही भाज्या आहेत ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही यूरिक अॅसिड नियंत्रित करू शकता.

वजन नियंत्रित करते

तुम्ही जर वाढत्या वजनाने त्रस्त झाला असाल तर आहारात पडवळाच्या भाजीचा समावेश करा. पडवळ वजन कमी करते आणि पचन व्यवस्थित ठेवते. आहारात पडवळाचे सेवन केल्याने शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात आणि युरिक अॅसिडही नियंत्रित राहते.

रक्त शुद्ध करते

तुम्ही जर तुमच्या आहारात पडवळाच्या भाजीचे सेवन केल्याने रक्तातील अशुद्धता काढून रक्त शुद्ध होते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध, पडवळ वृद्धत्वामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या कमी करते.

डोकेदुखी बंद होते

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले पडवळ डोकेदुखीपासून आराम देते. पडवळाच्या मुळास कापून पेस्ट बनवा आणि ती सुकेपर्यंत कपाळावर लावा, डोकेदुखीपासून आराम मिळेल.

यकृत निरोगी राहील

पडवळासोबतच त्याची पानेही खूप गुणकारी आहेत. पडवळाच्या पानांचा रस प्यायल्याने यकृत निरोगी राहते आणि युरिक अॅसिडही नियंत्रित राहते.

पडवळाचे सेवन कसे करावे

बटाटा-पडवळ तसेच तुम्ही भरलेले पडवळाची भाजी बनवून आहारात सेवन करू शकता. पडवळाचा तुम्ही भरता बनवून सुद्धा त्याचा सेवन तुम्हाला आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)