न्यूट्रिशनचं पॉवरहाऊस असलेल्या Pecan Nuts चे जाणून घ्या फायदे!

पेकान नट्स खरंतर अनेक जीवनसत्त्वे तसेच अधिक न्यूट्रिशन असलेले ड्राय फ्रूट आहे. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या रोगांपसून तुम्ही दूर राहू शकता.

पेकान नट्स मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, झिंक, ओमेगा -3 फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात आहे.(Photo : Pixabay)

अक्रोड सारखे दिसणारा पेकान नट्स हे फळ खरंतर भरपूर जीवनसत्व तसेच अधिक न्यूट्रिशन असलेलं ड्राय फ्रूट आहे. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. पेकन नट जरी आपल्या देशात इतके लोकप्रिय नसले, तरी हे एक अत्यंत फायदेशीर आणि औषधी खाद्य पदार्थ मानले जाते. पेकान नट्स हे ड्रायफ्रूट मेक्सिको आणि अमेरिकेच्या अनेक भागात जास्त करून आढळले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, झिंक, ओमेगा -३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय यामध्ये लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी ६, प्रथिने, कॅलरीज, फायबर हे पोषक घटक आहेत. यांच्या सेवनाने तुम्ही निरोगी राहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात पेकान नट्सचे फायदे.

१) हृदय निरोगी ठेवते

पेकान नट्स हे हृदयासाठी खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि निरोगी कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्यामुळे हृदयरोग दूर राहते.

२) मधुमेहापासून दूर ठेवते

हृदयरोग असलेल्या रुग्णांनी मधुमेहापासून दूर राहण्यासाठी या पेकान नट्सचं सेवन दररोज करा. याच्या सेवनाने तुमचं पोट देखील भरलेलं राहील. तसेच तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहील.

३) शरीरातील जळजळ कमी करते

पेकान नट्समध्ये असलेले ओमेगा 3 फॅट्स हे जळजळ कमी करून सांध्याच्या दुखण्यापासून देखील आराम देते. याशिवाय त्यामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन ई आणि झिंक देखील जळजळ कमी करते.

४) अॅंटीऑक्सिडंट्ससह समृद्ध

पेकान नट्समध्ये मुबलक प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्स असल्याने हे अल्झायमर (Alzheimer disease), पार्किन्सन हे आजार बरे करण्यास मदत करतात. याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत करते.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pecan nuts health benefits consume pecan nuts daily to get rid out from magnesium deficiency scsm

ताज्या बातम्या