scorecardresearch

‘या’ ३ राशीचे लोक मनातल्या गोष्टी कुणासोबतच शेअर करत नाहीत, असा असतो यांचा स्वभाव

काही लोक भडाभडा बोलून आपलं मन मोकळं करणारे असतात. तर काही लोक खूप शांत असतात आणि कुणासोबतही जास्त घेणंदेणं ठेवत नाहीत. ज्योतिषशास्त्रात अशा स्वभावाच्या तीन राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, जाणून घ्या नक्की कोणत्या आहे त्या तीन राशी आहेत….

astrology-1

काही लोक भडाभडा बोलून आपलं मन मोकळं करणारे असतात. तर काही लोक खूप शांत असतात आणि कुणासोबतही जास्त घेणंदेणं ठेवत नाहीत. कुणाच्या वादातही ते पडत नाहीत. त्यांच्या मनात विचारांचं अक्षरशः वादळ घोंगावत असलं तरी ते त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगत नाहीत. यामुळे अशा लोकांच्या मनात मोठी रहस्ये लपलेली असतात. इतरांनी त्यांच्या या रहस्यांचा विचार सुद्धा केलेला नसतो. ज्योतिषशास्त्रात अशा स्वभावाच्या तीन राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना त्यांच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट इतर कोणाशीही शेअर करणं आवडत नाही. हे लोक सर्व काही पूर्णपणे गुप्त ठेवतात. जाणून घ्या नक्की कोणत्या आहे त्या तीन राशी आहेत….

मीन: ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना आपल्या भावना लपवणे चांगलेच माहीत असते. त्यांच्या अंतःकरणात आणि मनात काय चालले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. गोष्टींबद्दल गोपनीयता राखण्यात त्यांचा विश्वास आहे. अशा स्थितीत लोक मीन राशीच्या लोकांबद्दल अनेकदा गोंधळून जातात की ते तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत. कधी कधी त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्याचा गैरसमज करतात.

सिंह: सिंह राशीचे लोक कोणतीही गोष्ट आवश्यक असेल तोपर्यंत गुप्त ठेवतात. गोष्टी लपवण्यात ते खूप पटाईत असतात. ते अशी कोणतीही गोष्ट कोणाच्याही समोर उघड करत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होईल. या राशीचे लोक अतिशय दयाळू असतात. याच कारणामुळे सिंह राशीचे लोक अनेकदा निराश होतात.

वृश्चिक : या राशीचे लोक कधीही फायदे-तोट्यांचा विचार करत नाहीत. ते सर्व काही पूर्णपणे गोपनीय ठेवतात. त्यांच्या पुढील वाटचालीचा अंदाज लावणे खूप कठीण मानले जाते. म्हणूनच, त्यांचा हा गुण अनेकदा त्यांना भारावून टाकतो. तथापि, वृश्चिक लोकांच्या स्वभावामुळे इतर लोक खूप आकर्षित होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-10-2021 at 19:14 IST