लग्न केव्हा करायचे आणि कोणाशी करायचे, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. पण काहीवेळा लग्नाचा विचार करूनही सोलमेट शोधायला खूप वेळ लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार असे ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे होते. काही लोक इच्छा नसतानाही लवकर लग्न करतात, तर काही लोकांचे लग्न व्हायला खूप वेळ लागतो. येथे तुम्हाला अशा चार राशींबद्दल माहिती मिळेल, ज्यांचे लग्न अनेकदा उशीराने होते.

कन्या

या राशीचे लोक परफेक्शनिस्ट असतात. लग्नाच्या बाबतीतही हीच वृत्ती दिसून येते. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून अनेक अपेक्षा असतात आणि त्यांच्या जोडीदाराने प्रत्येक अपेक्षा पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा असते. यामुळे त्यांना लग्नाचा निर्णय लवकर घेता येत नाही. त्यांना इच्छित जीवनसाथी मिळण्यासाठी बराच वेळ जातो.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने
Marriage Astrology
‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी

( हे ही वाचा: हिवाळ्यात ओठ फाटण्याच्या समस्येने तुम्ही हैराण आहात का? करा ‘हे’ घरगुती उपाय )

वृश्चिक

या राशीचे लोक इतरांसमोर सहजासहजी आपले मन व्यक्त करू शकत नाहीत. एखाद्यावर प्रेम केले तरी ते प्रेम व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांचे फिलिंग कळतही नाही. या स्वभावामुळे ते नात्यात लवकर येऊ शकत नाहीत. त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी त्यांना बराच वेळ लागतो.

( हे ही वाचा: Vastu Shastra: धन-संपतीसाठी ‘या’ गोष्टी घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास होतो फायदा )

धनु

या राशीचे लोक खूप चांगले स्वभावाचे असतात. त्यांना स्वतंत्र राहायला आवडते. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. त्यांच्या आयुष्यात कोणाचा हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना गाठ बांधण्याची भीती वाटते. सहसा त्यांच्या लग्नाला उशीर होण्याची शक्यता असते.

( हे ही वाचा: WhatsApp वरून मागवा राशन, JioMart ने सुरू केली सेवा; Amazon आणि Flipkart ला बसणार फटका? )

मीन

या राशीचे लोक सहजासहजी कोणाशीही मिसळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जीवनसाथी निवडण्यासाठी खूप वेळ लागतो. पण ज्याच्याशी ते एकदा मनापासून जोडले जातात त्या व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात.