Ideal Height to Waist Ratio: कंबरेचा आकार तुमच्या वजनाच्या निम्म्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचे वजन योग्य आहे का हे तपासण्यासाठी सर्वात जास्त वापरलेली पद्धत म्हणजे बॉडी मास इंडेक्स (BMI)! १८ ते २५ पर्यंतचे बीएमआय हे निरोगी वजन मानले जाते, २५ ते ३० जास्त वजन असते आणि ३० पेक्षा जास्त लठ्ठ असते. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स निरोगी राहण्यासाठी कंबर व उंचीचे प्रमाण मोजण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्या उंचीनुसार कंबरेची रुंदी योग्य प्रमाणात असणे हे सुदृढ शरीराचे लक्षण आहे ज्यामुळे टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासह गंभीर परिस्थितींचा धोका टाळता येऊ शकतो.
कंबर व उंची यांची तुलना करण्यासाठी आपण ऑनलाइन कॅल्क्युलेटर वापरू शकता. बरगड्यांपासून नितंबांच्या वरपर्यंतचा भाग म्हणजे कंबर, या बिंदूंच्या मध्यभागी कंबरेभोवती एक मोजपट्टी गुंडाळा आणि माप घेण्यापूर्वी नैसर्गिकरित्या श्वास घ्या. तुमच्या उंचीनुसार सरासरी आपली कंबर किती रुंद असायला हवी हे आता आपण पाहूया.
उंची | कंबरेची रुंदी (जास्तीत जास्त) |
5′ (152 सेमी) | कमाल 30″ (76 सेमी) |
5’2 (158 सेमी) | कमाल 31″ (79 सेमी) |
5’4 (163 सेमी) | कमाल 32″ (82 सेमी) |
5’6 (168 सेमी) | कमाल 33″ (84 सेमी) |
5’8 (173 सेमी) | कमाल 34″ (87 सेमी) |
5’10 (178 सेमी) | कमाल 35″ (89 सेमी) |
6′ (183 सेमी) | कमाल 36″ (92 सेमी) |
6’2 (188 सेमी) | कमाल 37″ (94 सेमी) |
6’4 (193 सेमी) | कमाल 38″ (97 सेमी) |
हे ही वाचा<< शौचाला न होणे हेसुद्धा असू शकते कोलन कॅन्सरचे लक्षण; शरीराचे ‘हे’ ५ संकेत पहिल्याच टप्प्यावर ओळखा
दरम्यान, वरील तक्ता हा आदर्श प्रमाण आहे. सध्याच्या घडीला तुमच्या शरीराचे मोजमाप यानुसार असेलच असे नाही पण म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य आहार व व्यायाम केल्यास आपण आदर्श शरीर मिळवू शकता. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या.