scorecardresearch

सतत लघवी होणे ठरू शकते ‘या’ आजाराचे कारण; लगेचच आहारात करा बदल

जास्त लघवी होणे हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे कारण असू शकते. हे इन्फेक्शन मूत्र प्रणालीच्या कोणत्याही भागात होऊ शकणारे इन्फेक्शन आहे.

महिलांमध्ये युरिन इन्फेक्शनची तक्रार किशोरावस्थेपासूनच दिसून येते. (Photo : Pexels)

सतत लघवी होणे ही अशी एक समस्या आहे जिच्याकडे बहुतेक महिला दुर्लक्ष करतात. तुम्हाला माहित आहे का, जास्त लघवी होणे हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे कारण असू शकते. हे इन्फेक्शन मूत्र प्रणालीच्या कोणत्याही भागात होऊ शकणारे इन्फेक्शन आहे. जेव्हा मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात बॅक्टेरिया जमा होतात तेव्हा त्या भागात सूज आणि जळजळ होते. या जीवाणूंमुळे मूत्रमार्गात सूज निर्माण होते, ज्यामुळे लघवी करताना जळजळ होऊ शकते. ते मूत्रमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि मूत्राशय व मूत्रपिंडांना नुकसान करतात.

महिलांमध्ये युरिन इन्फेक्शनची तक्रार किशोरावस्थेपासूनच दिसून येते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, महिलांना त्यांच्या आयुष्यात युरिन इन्फेक्शन नक्कीच होते. या संसर्गाची कारणे काय आहेत आणि या आजारावर आपण आपल्या आहाराच्या माध्यमानेच कसा उपचार करू शकतो हे जाणून घेऊया.

लग्नात वधूने मेहंदी लावण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; न लावल्यास होऊ शकते नुकसान

मूत्रमार्गाच्या संसर्गाची कारणे:

  • लघवी केल्यानंतर मूत्रमार्ग मागून पुढच्या बाजूने पुसल्याने बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संसर्ग वाढतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मूत्रमार्ग लहान असतो, त्यामुळे जीवाणूंना मूत्राशयात प्रवेश करणे सोपे होते.
  • संभोग करताना मूत्रमार्गात जीवाणू प्रवेश केल्यामुळे देखील संसर्ग होऊ शकतो.
  • सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्याने जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
  • टॉयलेटमधील घाणेरड्या पाण्याचा मूत्रमार्गास स्पर्श झाल्यासही बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात.
  • संप्रेरक बदल, मल्टिपल स्क्लेरोसिस, किडनी स्टोन, स्ट्रोक आणि पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळेही लघवीवर परिणाम होतो.

मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी, आहारात पुढील पदार्थांचा समावेश करा

द्रव पदार्थांचे सेवन करा :

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. द्रव पदार्थांचे सेवन केल्याने लघवी पातळ होते. जास्त द्रवपदार्थ सेवन केल्याने संसर्ग सुरू होण्यापूर्वी तुमच्या मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडतात.

करवंदाचा रस :

करवंद हे अतिशय चवदार आणि फायदेशीर फळ आहे. याच्या रसामुळे यूटीआयला प्रतिबंध होतो आणि आरोग्याला फायदा होतो. संसर्ग कमी करण्यासाठी तुम्ही या रसाचे सेवन करू शकता.

आवळ्याच्या रसाचे सेवन :

व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, तसेच युरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो. युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी दिवसातून ४-५ वेळा आवळ्याचा रस प्या.

घरातील झुरळांमुळे हैराण असाल तर करा ‘हे’ सोपे उपाय; कायमची दूर होईल समस्या

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर देखील प्रभावी :

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर युरिन इन्फेक्शन रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे. लिंबाचा रस आणि मध मिसळून अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरा.

या सवयी बदला

  • लघवी केल्यानंतर ती जागा पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर पुढून मागे असा करावा.
  • मूत्राशय रिकामे करण्यासाठी संभोगानंतर लगेच लघवी करा. एक ग्लास पाणी प्या म्हणजे बॅक्टेरिया लघवीद्वारे बाहेर पडतात

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Persistent urination may be the cause of this disease make immediate dietary changes pvp

ताज्या बातम्या