Seating Position Personality: एखाद्या मीटिंगमध्ये, ऑफिसमध्ये किंवा गर्दीच्या खोलीत शिरल्यानंतर तुम्ही सर्वात आधी काय करता? अनेकदा नकळतपणे आपण बसण्यासाठी एखादी विशिष्ट खुर्ची निवडतो. काही लोक नेहमी पुढे बसतात, काही कोपऱ्यात जागा शोधतात, तर काही जण थेट समोरची जागा पकडतात. पण, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही निवडलेली खुर्ची तुमच्या स्वभावाबद्दल, विचार करण्याच्या पद्धतीबद्दल आणि लोकांशी वागण्याच्या शैलीबद्दल बरेच काही सांगू शकते?
होय! मानसशास्त्राशी संबंधित या मनोरंजक Personality Test मध्ये तुम्ही निवडलेली बसायची जागा तुमच्या मनातील अनेक गुपितं उघड करू शकते. विशेष म्हणजे, तुम्ही कोणती खुर्ची निवडता यावरून तुम्ही नेतृत्व करणारे आहात, शांत निरीक्षक आहात की हुशार रणनीती आखणारे व्यक्ती आहात, याचाही अंदाज लावला जातो.
खुर्ची क्रमांक १ – विश्वासू सहकारी
जर तुम्ही पहिली खुर्ची निवडली असेल, तर तुम्हाला नेहमी महत्त्वाच्या लोकांच्या जवळ राहायला आवडतं. तुम्ही जबाबदारी स्वीकारणारे आणि कामात मदत करणारे व्यक्ती आहात. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि अडचणीच्या वेळी तुम्ही पुढे येता.
खुर्ची क्रमांक २ – शांत समन्वयक
ही जागा निवडणारे लोक शांत, समजूतदार आणि निरीक्षण करणारे असतात. त्यांना थेट चर्चेच्या केंद्रस्थानी राहायला आवडत नाही; पण प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारकाईने लक्ष असतं. हे लोक वातावरण समजून मगच मत मांडतात.
खुर्ची क्रमांक ३ – विचारपूर्वक निर्णय घेणारे
जर तुम्ही तिसरी खुर्ची निवडली असेल, तर तुम्ही घाईत बोलणारे नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेता. लोक बोलत असताना तुम्ही शांतपणे निरीक्षण करता आणि योग्य वेळीच तुमचं मत मांडता.
खुर्ची क्रमांक ४ – तर्कशुद्ध विचार करणारे
ही खुर्ची निवडणारे लोक प्रत्येक गोष्ट प्रश्न विचारून समजून घेतात. इतर जिथे सहज होकार देतात, तिथे तुम्ही “हे खरंच योग्य आहे का?” असा विचार करता. तुमचा दृष्टिकोन विश्लेषणात्मक असतो.
खुर्ची क्रमांक ५ – थेट आव्हान देणारे
जर तुम्ही समोरची खुर्ची निवडली असेल तर तुमच्यात आत्मविश्वास भरपूर आहे. तुम्ही स्पष्ट बोलणारे आहात आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यास घाबरत नाही. चर्चेमध्ये आपलं मत ठामपणे मांडणं ही तुमची ताकद असते.
खुर्ची क्रमांक ६ – शांत निरीक्षक
कोपऱ्यातील जागा निवडणारे लोक शांत असले तरी अत्यंत हुशार असतात. ते लोकांचं बोलणं, त्यांची देहबोली आणि वातावरणाचं बारकाईने निरीक्षण करतात. योग्य वेळ येईपर्यंत ते शांत राहतात.
खुर्ची क्रमांक ७ – रणनीती आखणारे
ही जागा निवडणारे लोक प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक सहभागी होतात. ते प्रत्येक चर्चेत उगाच बोलत नाहीत. योग्य वेळ येताच त्यांचं एक वाक्यही संपूर्ण चर्चेचा विषय बदलू शकतं.
खुर्ची क्रमांक ८ – सगळ्यांना जोडून ठेवणारे
जर तुम्ही ही जागा निवडली असेल तर तुम्ही लोकांना एकत्र ठेवणारे आणि वातावरण हलकंफुलकं करणारे व्यक्ती आहात. लोकांना तुमच्यासोबत मोकळं वाटतं आणि तुम्ही सहज मैत्री करता.
खुर्ची क्रमांक ९ – मार्गदर्शन शोधणारे
ही खुर्ची निवडणारे लोक अनुभवी व्यक्तींच्या जवळ राहणं पसंत करतात. त्यांना शिकायला आवडतं आणि नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींशी चांगलं नातं ठेवण्यावर त्यांचा विश्वास असतो.
Personality Test का आवडतात लोकांना?
अशा प्रकारचे टेस्ट लोकांना स्वतःचा स्वभाव समजून घेण्यासाठी मदत करतात. काही वेळा आपल्या सवयी, वागणूक किंवा निर्णय घेण्याची पद्धत आपल्यालाच माहीत नसते. अशा टेस्टमुळे स्वतःबद्दल नवीन गोष्टी समोर येतात. शिवाय मित्र-मैत्रिणी, सहकारी आणि कुटुंबीयांसोबत चर्चा करण्यासाठीही हे टेस्ट मजेशीर ठरतात.
मग सांगा, तुम्ही कोणती खुर्ची निवडाल? कारण तुमची एक छोटी निवड तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठं रहस्य उघड करू शकते!
