scorecardresearch

Premium

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेनंतरही इंधनाचे दर जवळपास स्थिरच आहेत.

lifestyle
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात.(photo: indian express)

सरकारी तेल कंपन्यांनी रविवार, १४ नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही दरात वाढ झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यूपीसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपेक्षा कमी दराने मिळत आहे.

दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेनंतरही इंधनाचे दर जवळपास स्थिरच आहेत.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

राज्यांनीही किमती कमी केल्या होत्या

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे ही कपात झाली आहे. यासोबतच अनेक राज्यांतील राज्य सरकारांनीही आपापल्या पातळीवर किमती कमी केल्या आहेत. उदाहरणार्थ, यूपीमध्ये पेट्रोल १२ रुपयाने आणि डिझेल १२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर यूपीसह अनेक शहरांमध्ये तेल १०० रुपयांच्या खाली आले आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

आजच्या पेट्रोल डिझेलच्या किमती

दिल्ली पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे

चेन्नई पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डीजल ८९.७९ रुपये प्रति लीटर

श्रीगंगानगर पेट्रोल ११४.०१ रुपये आणि डीजल ९८.३९ रुपये प्रति लीटर

या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल १०० रुपयांच्या खाली आहे

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रति लिटर

नोएडा पेट्रोल ९५.५१ रुपये आणि डिझेल ८७.०१ रुपये प्रति लिटर

इटानगर पेट्रोल ९२.०२ रुपये आणि डिझेल ७९.६३ रुपये प्रति लिटर

चंदीगड पेट्रोल ९४.२३ रुपये आणि डिझेल ८०.९ रपये प्रति लिटर

आयझॉल पेट्रोल ९४.२६ रुपये आणि डिझेल ७९.७३ रुपये प्रति लिटर

लखनौ पेट्रोल९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८ रुपये प्रति लिटर

शिमला पेट्रोल ९५.७८ रुपये आणि डिझेल ८०.३५ रुपये प्रति लिटर

पणजी ९६.३८ रुपये आणि डिझेल ८७.२७ रुपये प्रति लिटर

गंगटोक ९७.७ रुपये आणि डिझेल ८२.२५ रुपये प्रति लिटर

रांची ९८.५२ रुपये आणि डिझेल ९१.५६ रुपये प्रति लिटर

शिलाँग ९९.२८ आणि डिझेल ८८.७५ रुपये प्रति लिटर

डेहराडून ९९.४१ रुपये आणि डिझेल ८७.५६ रुपये प्रति लिटर

दमण ९३.०२ आणि डिझेल ८६.९ रुपये प्रतिलिटर

दररोज ६ वाजता किंमत बदलते

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार होत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी या करिता इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel price today new rates of petrol and diesel released know what is going on today scsm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×