Pineapple juice: कोल्ड्रिंक्स असो किंवा बाजारात मिळणारे हवाबंद बाटलीतील फळांचा रस असो या सगळ्याचे सातत्याने सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही. लोक अनेकदा बाजारातून शीतपेये किंवा ज्यूस खरेदी करून पितात. परंतु, ज्यात भरपूर साखर असते, जी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही. आजकाल अननसाचे फळ बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरी शुद्ध व ताजा अननसाचा रस काढू शकता आणि तो पिऊ शकता. या रसाच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात.

अननसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे हंगामी आजारांपासून संरक्षण होते. या फळात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मदत करतात.

हाडे आणि पोटासाठी फायदेशीर

अननसाचा रस प्ययाल्याने हाडे मजबूत होतात. ते प्यायल्याने बद्धकोष्ठता होत नाही. त्यामुळे लूज मोशनमध्येही आराम मिळतो. कारण- त्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी अननसाचा रस कसा बनवायचा?

  • १ अननस
  • १ डाळिंब
  • साखर
  • १ मोठा ग्लास पाणी
  • बर्फ

अननसाचा रस बनवण्याची रेसिपी

अननसाचा रस बनविण्यासाठी प्रथम अननस सोलून त्याचे तुकडे करा. नंतर ते एका प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर डाळिंब सोलून घ्या. त्यानंतर अननसाचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, त्यात चवीनुसार थोडी साखर आणि पाणी घाला. आता सर्व गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून हा रस गाळून घ्या. तयार रस एका काचेच्या बाटतील भरून, फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. २-३ तासांनी हा रस तुम्ही पिऊ शकता.