scorecardresearch

सांधेदुखीच्या रुग्णांसाठी अमृता सारखी आहे ‘ही’ एक गोष्ट; वाढलेले युरिक ॲसिड झपाट्याने करू शकते कमी

Gout Problems Relief: ब्रोमेलेन एक एन्झाइम आहे जो अननसाच्या रसातून काढला जातो आणि भारतात सहज उपलब्ध होतो.

सांधेदुखीच्या रुग्णांसाठी अमृता सारखी आहे ‘ही’ एक गोष्ट; वाढलेले युरिक ॲसिड झपाट्याने करू शकते कमी
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Arthritis Home Remedy: arthritisindia.com नुसार, भारतातील २०० दशलक्षाहून अधिक लोक संधिवात ग्रस्त आहेत. मधुमेह, एड्स, कॅन्सर यांसारख्या अनेक गंभीर आजारांपेक्षा सांधेदुखीचा प्रसार वेगाने होत आहे. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या सुमारे १४ टक्के भारतीयांना डॉक्टरांची गरज असते. सांध्याभोवती सूज आल्याने सांध्याचा हा आजार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीला दुखापत, आजारपण, स्नायूंच्या ताणामुळे सांधेदुखी आणि थकवा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत ब्रोमेलेनचे सेवन खूप फायदेशीर ठरले आहे.

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या मते, गाउट ग्रस्त लोकांसाठी ब्रोमेलेन एक वरदान आहे. वास्तविक हे एक एन्झाइम आहे, जे अननसाच्या रसातून काढले जाते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरीही सहज बनवू शकता. चला जाणून घेऊया या घरगुती ज्यूसचे फायदे. पण आधी ब्रोमेलेनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ..

ब्रोमेलेन म्हणजे काय?

यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सायन्सेसच्या मते, ब्रोमेलेन हा बायोऍक्टिव्ह एन्झाइमचा एक प्रकार आहे जो अननसाच्या रसामध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या एंजाइमचे मिश्रण आहे. ब्रोमेलेन हे प्रोटीओलाइटिक एंजाइम मानले जाते जे पूरक स्वरूपात उपलब्ध आहे. ब्रोमेलेन सप्लिमेंट्स विविध आजारांवर उपचार करतात असे म्हटले जाते. विशेषतः दाहक रोगांवर हा सर्वोत्तम उपचार आहे. हे पचन सक्रिय करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जाते. हे सहसा जेवताना घेतले जाते.

( हे ही वाचा: वाढलेली Blood Sugar झपाट्याने कमी करतील ‘या’ झाडाची पाने? फक्त खाण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)

सांध्यांना सूज येण्यापासून सुटका मिळते

ज्या लोकांचे नेहमी सांधे सुजतात किंवा दुखत असतात त्यांनी अननसाचा रस जरूर प्यावा. हे सांधेदुखी कमी करणारे पेय दोन्ही प्रकारच्या संधिवातांशी संबंधित लक्षणे कमी करू शकते. Express.co.uk च्या मते, संधिवातची लक्षणे कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याबरोबरच निरोगी आहारावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. एका अभ्यासानुसार अननसाचा रस शरीरातील सूज लवकर दूर करतो. हे एक साइट्रस-चविष्ट फळ आहे, जे व्हिटॅमिन सी आणि ब्रोमेलेन एंझाइमने समृद्ध आहे.

ब्रोमेलेन वेदना कमी करणाऱ्या औषधांपेक्षा आहे प्रभावी

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NCBI) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अननसातील ब्रोमेलेन केवळ वेदना कमी करण्यासाठी वापरले जात नाही तर शस्त्रक्रिया, सायनस, हिरड्या आणि शरीरातील इतर आजारांवरही याचा खूप उपयोग होतो. ऑस्टियोआर्थरायटिस, कर्करोग, पाचन समस्या, स्नायू दुखणे यापासून आराम मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जर्नल आर्थरायटिस रिसर्च इन थेरपीमधील २००६च्या पुनरावलोकनात असे आढळून आले की ब्रोमेलेन इतर औषधांपेक्षा अधिक फायदेशीर आहे.

अननसाचा रस पिण्याचे फायदे

  • ताजे अननस खाणे किंवा त्याचा रस पिणे किंवा सप्लिमेंट म्हणून घेणे खूप फायदेशीर आहे.
  • अननसात आढळणारे पॉलीफेनॉल नावाचे सेंद्रिय संयुगे ऑस्टियोआर्थराइटिस वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
  • अननसात भरपूर फायबर असते. त्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका त्याच्या वापराने खूप कमी होतो.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ४ पदार्थ? डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत)

ब्रोमेलेनचे दुष्परिणाम

  • ज्या लोकांना अननसाची ऍलर्जी आहे त्यांना ते खाल्ल्यानंतर अस्वस्थता जाणवू शकते.
  • Bromelain गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना वापरण्यास फारसे सुरक्षित नाही.
  • ब्रोमेलेन विशिष्ट औषधांवर प्रतिक्रिया देऊ शकते, जसे की प्रतिजैविक अमोक्सिसिलिन. तुम्ही औषधे घेत असाल तर ब्रोमेलेन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • घेतल्यावर तुम्हाला खाज जाणवत असेल, तर त्याला ताबडतोब वापरणे थांबवा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 20:50 IST

संबंधित बातम्या