जन्माष्टमीचा उत्सव जवळ आला आहे आणि संपूर्ण भारतात खूप उत्साहाने आणि भक्तिभावाने तो साजरा केला जातो. या सणाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम. या कार्यक्रमावेळी आपल्याकडील तरुण मुले आपसात एक मानवी पिरॅमिड तयार करतात आणि उंचावर असलेल्या हंडीला फोडण्याचा प्रयत्न करतात. हंडी फोडण्यासाठी हे मानवी पिरॅमिड फार मजबूत आणि धोरणात्मकरित्या तयार करावे लागतात. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनाचे आहे. संपत्ती निर्माण करून आर्थिकदृष्ट्या आनंदी जीवन जगण्याची इच्छा तर सर्वांनाच असते. यासाठी पिरॅमिडप्रमाणेच आर्थिक स्थिरतेसाठी धोरणात्मक दृष्टीकोन आवश्यक असतो. या पिरॅमिडचे स्तर विस्तृतपणे जाणून घेऊया…

बचत – पाया मजबूत असावा

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

सर्वात आधी तुम्हाला आर्थिक नियोजनाची पायाभरणी करावी लागते. शक्य तेवढ्या लवकर बचत सुरू करून भक्कम पाया तयार करा, कारण तुमच्या आर्थिक पिरॅमिडसाठी हा फार महत्वाचा घटक आहे. कारण याच्या वरील मजले हे पायाच्या भक्कमपणावरच अवलंबून असतात. बचत कमी वयातच सुरू केल्याने तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुमचा पैसा चक्रवाढ दराने वृद्धिंगत होण्यात मदत होते. तुम्ही अगदी लहान रकमेपासून सुरू करू शकता. एखाद्याने विशीतच लहान रकमेपासून सुरूवात केलेली असली, तर त्याला अधिक परतावा मिळेल. यात गृहीत धरले आहे की दोघे ही ६० वर्षे वयात रिटायर होणार. तसेच बचत करण्याची सवय झाल्याने तुम्हाला अवास्तव खर्च करणे सहज टाळता येईल.

सुरक्षा – स्वतःचे आणि कुटुंबीयांचे आजार-मृत्यू पासून रक्षण करा

त्यावरचा थर म्हणजे अचानकपणे येणारे आजार, नोकरी जाणे इत्यादी संकटांपासून रक्षणासाठी आर्थिक सुरक्षेची एक भक्कम भिंत तयार करणे. सहा महिने ते एक वर्षाचा खर्च भागेल एवढा संकटकालीन निधी तयार करून ठेवा जो अशावेळी तुमच्या कामास येईल. हा वारसा जपण्यास, तुमचा आर्थिक मार्ग विनाव्यत्यय असणे आवश्यक आहे. तुमची बचत तुम्ही आपत्कालीन स्थितीसाठी वापरू शकत नाहीत. तुम्ही टर्म आयुर्विमा पॉलिसी, तसेच तुम्ही आरोग्यविमा पॉलिसीद्वारे मृत्यू आणि आजारापासून स्वतःला आणि कुटुंबाला संरक्षण दिले पाहिजे. आरोग्यविमा पॉलिसी तुम्हाला आर्थिक आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय खर्चांच्या ओझ्यापासून, तसेच दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्याही खर्चांपासून वाचवते. तुमच्या अकाली मृत्यूच्या दशेत टर्म विमा पॉलिसी तुमच्या कुटुंबासाठी मिळकतीची उणीव भरून काढते. अशाने तुमच्या पश्चात् सुद्धा कुटुंबाला आर्थिक अडचणी येणार नाहीत आणि ते ते आरामदायक जीवन जगू शकतील.

आनंद घ्या – स्वतःचा शोध घ्या

वरील दोन थर पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे तुमचे कर्ज पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी राहील, तेव्हा या वेळात क्रेडिट कार्डे आणि वैयक्तिक कर्ज यांच्या सहाय्याने आपला आनंद साजरा करा. स्वतःला काही भेटवस्तू द्या – जसे एखादी सहल किंवा कार. मात्र अशा वेळी हा खर्च आपण सहज पेलू शकू अशी स्वतःची खात्री करून घ्या. कर्ज घेणार असलात तर परतफेडीचे नियोजन करून ठेवा आणि वेळेवर आणि पूर्ण हप्ते भरा.

संवर्धन: मालमत्ता गोळा करा, कर्ज पूर्ण करा, रिटायरमेंट निर्धोक करा

म्युचूअल फंड, इक्विटी, स्थावर मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करा. तुमच्या परताव्याच्या अपेक्षेप्रमाणे आणि गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे गुंतवणूक निवडा. गरज पडेल तेव्हा कर्ज घ्या, पण त्यांना वेळीच पूर्ण करा. कर्ज घेणे नेहमीच वाईट नसते. गृह कर्ज तुमची खरेदीची शक्ती वाढवते, म्हणून गृह कर्ज घेतल्याने तुम्ही असे मोठे काम करू शकता जे तुमच्या बचतीच्या पैशातून पूर्ण होणे महाकठीण असते. जर घर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा जमा होण्याची वाट पाहत बसलात, तर घराच्या किमती तुम्ही जमा केलेल्या निधीच्या पुढे-पुढेच धावतील याची खात्री करुन घ्या

शांतता – तुमचा वारसा

या दशेत तुमची सर्व स्वप्ने पूर्ण झालेली असतात, रिटायरमेंट निर्धोक असते आणि तुमची संपत्ती कर्ज-मुक्त असते. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही हंडी फोडून जीवनाच्या रिवॉर्डचा आनंद लुटू शकता. जर तुम्ही संपत्ती निर्माण करण्यात आणि कर्ज पूर्ण करण्यात आयुष्य घालवले असेल, तर तुमचे रिटायरमेंट नंतरचे आयुष्य अत्यंत शांततेने निघेल आणि तुमच्या मुला-बाळांसाठी तुम्ही कर्ज-मुक्त संपत्ती मागे ठेऊन जाल. तुमचा क्रेडिट इतिहास सुद्धा निष्कलंक असेल.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार