Pregnancy Tips : करोना काळात प्रेग्नन्सी प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या

प्रेग्नन्सीच्या काळात करोना संक्रमण केवळ आईलाच नाही तर तिच्या गर्भातील बालकासाठी देखील घातक ठरू शकते.

pregnancy
ओमायक्रॉन विषाणूपासून गरोदर महिला आणि मुलांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. (Photo : Pixabay)

करोना काळात प्रेग्नन्सी प्लॅन करणं फारच कठीण झालं आहे. या दरम्यान आई आणि मूल या दोघांचा करोनापासून बचाव करणे गरजेचे आहे. प्रेग्नन्सीमध्ये गरोदर महिलेला आपल्या खाण्यापिण्यापासून ते शारीरिक हालचालींपर्यंत सगळीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. करोना विषाणू सतत आपले रूप बदलत आहे आणि त्यातच आता ओमायक्रॉन विषाणूचा सर्वांना सर्वाधिक धोका आहे.

ओमायक्रॉन विषाणूपासून महिला आणि मुलांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. प्रेग्नन्सीच्या काळात करोना संक्रमण केवळ आईलाच नाही तर तिच्या गर्भातील बालकासाठी देखील घातक ठरू शकते. जर तुम्हीही गर्भधारणेचा विचार करत असाल तर काही खास टिप्सची काळजी घ्या जेणेकरून संसर्ग टाळता येईल.

Health Tips : हिवाळ्यात वाढू शकतो हृदयविकाराचा धोका; आजच बंद करा ‘या’ सवयी

संतुलित आहार घ्या :

जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल तर सगळ्यात आधी आपल्या आहाराची काळजी घ्या. पोषण तत्त्वांची भरपूर मात्रा असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच जंक फूड, तेलकट आणि जास्त मसाल्याचे पदार्थ, पॅकेटबंद पदार्थ कटाक्षाने टाळावेत. असे पदार्थ बाळाच्या आरोग्याला धोका पोहचवू शकतात.

करोना संसर्ग झाला असल्यास ‘या’ गोष्टींची काळजी घ्या :

जर तुमची गर्भधारणा झाली असेल आणि या काळात तुम्ही कोरोनाच्या विळख्यात आला असाल तर काळजी करू नका. तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करून घ्या. तुमच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासात राहा. जास्त लोकांच्या संपर्कात येणे टाळा. जर तुम्ही लस घेतली नसेल तर ताबडतोब लसीकरण करून घ्या.

नियमित हलका व्यायाम करा :

करोनाच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही घरीच योगा आणि मेडिटेशन करू शकता. व्यायाम केल्याने तणाव आणि चिंताही दूर होते. घरच्या घरी अनुलोम-उलटा व्यायाम करा, तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहील.

उच्च रक्तदाब ते मधुमेह कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे अंजीर; जाणून घ्या इतर फायदे

लोकांपासून अंतर ठेवा:

कोरोनाच्या काळात जास्त लोकांच्या संपर्कात येणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. कोरोनाचे नियम पाळा. फेस मास्क घाला आणि हात स्वच्छ करा.

चेहऱ्याला आणि तोंडाला हात लावू नका :

तुमच्या खोलीतील खुर्ची, टेबल, दाराला स्पर्श केल्यानंतर चेहऱ्याला हात लावू नका. हात धुवा नंतर नाक आणि तोंडाला स्पर्श करा.

मास्क घालावा :

कोरोनापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर नेहमी मास्क ठेवा. जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर हात सॅनिटाइझ करत राहा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Planning for baby in pandemic then take care of these things pvp

Next Story
डार्क सर्कलमुळे चेहरा खराब होतोय, मग लावा गाजराचा मास्क, जाणून घ्या कसा बनवायचा?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी