सिडनी : खंडित निद्रा (स्लीप अ‍ॅप्निआ) या विकाराने जगभरात एक अब्ज रुग्णांना ग्रासले आहे. निद्रेदरम्यान घशातील स्नायू शिथिल पडल्याने श्वासमार्ग अंशत: किंवा पूर्ण बंद होतो. त्यामुळे श्वासोच्छ्वास बंद पडतो. ही अवस्था दहा सेकंदापासून एखाद्या मिनिटापर्यंत राहते. त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू करण्यासाठी व्यक्तीच्या नकळत त्याची निद्रा वारंवार खंडित होते. त्यामुळे स्मृतीवर परिणाम होतो. हा विकार तीव्र असलेल्या रुग्णांत ही निद्रा तीस वेळा खंडित होते. काही जणांत रात्रभरात सुमारे तासभर म्हणजे एकूण ६० मिनिटे ही निद्रा वारंवार खंडित होते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता पार खालावते. या विकाराचे रुग्ण झोपेत घोरतात, सारखी कूस बदलतात व अस्वस्थ असतात. जागे असणाऱ्या इतरांना या झोपलेल्या रुग्णांचा श्वास थांबतोय, अडकतोय व श्वास घेण्यासाठी चाललेला त्यांचा झगडा चांगलाच जाणवतो. या विकारामुळे झोप नीट न झाल्याने दिवसभर झोपाळल्यासारखे वाटणे, एकाग्रतेचा अभाव व ताजेतवाने वाटत नाही. काही जणांना दैनंदिन कामकाज करणे अशक्य होते. या विकारामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण रात्री कमी होते. त्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका दुप्पट वाढतो. खंडित निद्रेमुळे आकलनक्षमता कमी होते. त्यामुळे मेंदूत स्मृतिभ्रंशांला कारक घटक वाढू लागतात. खंडित निद्रेवर उपचार केल्याने स्मृतिभ्रंश विकाराचा संभव कमी होतो अथवा नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.  या विकारावर उपचारांसाठी ‘कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर थेरपी’ वापरतात. त्यात निद्रेदरम्यान श्वासनलिकेला जोडलेला पंप पुरेशा दाबाने हवा श्वासनलिकेत सोडतो. त्यामुळे स्नायू शिथिल होऊन श्वासनलिका बंद होणारा भाग हवेच्या दाबाने मोकळा होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीस शांत झोप लागते. रक्तातील ऑक्सिजन पातळीवर दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे स्मृती सुधारण्यास नक्की मदत होते. ज्येष्ठ नागरिकांवर या उपचारांमुळे त्यांची अल्पकालीन स्मृती चांगली सुधारते व आकलनक्षमताही चांगली होण्यास मदत होते.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?