छोट्या बचतीसाठी पोस्ट ऑफिस हा नेहमीच चांगला पर्याय राहिला आहे. येथे तुम्ही ठेवलेली ठेव उत्तम परताव्यासह पूर्णपणे सुरक्षित असते. यामध्ये गुंतवलेल्या पैशावर शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही कारणाचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय मिळेल.

८ लाख जमा केल्यावर मिळतील १०,९६,००० रुपये

SCSS कॅल्क्युलेटरनुसार तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत एकरकमी ८ लाख रुपये गुंतवल्यास ५ वर्षांत एकूण परिपक्वता रक्कम १०,९६,००० रुपये हे वार्षिक ७.४ टक्के व्याजदराने मिळणार. यात तुम्हाला २,९०,००० रुपये व्याज म्हणून मिळतील. हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत उघडू शकता.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

किमान ऐवढ्या रुपयांनी SCSS मध्ये करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्याच वेळी या योजनेतील परिपक्वता कालावधी ५ वर्षे आहे. त्याच वेळी या बचत योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

SCSS खाते कोण उघडू शकते?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणताही भारतीय नागरिक वयाच्या ६० वर्षांनंतर खाते उघडू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे वय ५५ वर्षे असेल आणि त्याने VRS घेऊन सेवानिवृत्ती घेतली असेल, तर तो पोस्ट ऑफिसच्या SCSS खात्यातही गुंतवणूक करू शकतो. परंतु अट अशी आहे की सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत त्याने हे खाते उघडले पाहिजे आणि त्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

SCSS गुंतवणुकीत मिळणार आयकर सूट

पोस्ट ऑफिसच्या SCSS योजनेतील गुंतवणुकीला आयकर कलम ८०C अंतर्गत सूट देण्यात आली आहे. SCSS योजनेतील व्याज उत्पन्न वार्षिक ५० हजारांपेक्षा जास्त असल्यास तुमचा TDS कापण्यास सुरुवात होईल. कराची रक्कम तुमच्या व्याजातून वजा केली जाते. जर व्याज उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही फॉर्म १५G/१५H सबमिट करून TDS मधून सूट मिळवू शकता.