Priyanka Chopra’s mom shares henna haircare trick : मेहंदी ही अनेकांसाठी आवडती केस रंगवण्याची पद्धत आहे. पण केसांना मेंहदी लावणाऱ्यांची एक तक्रार नेहमी असते की, त्यामुळे केस कोरडे होतात. पण बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या आई मधु चौप्रा यांनी या समस्ये लढण्यासाठी एक भन्नाट हॅक सुचवला आहे.

इंस्टाग्राम रीलमध्ये डॉ. मधु चोप्रा यांनी सांगितले की, केसांना मेहंदी लावून तासभर ठेवल्यानंतर ते धुण्यापूर्वी वाळलेल्या मेहदीवर त्या एका आदिवासी तेलात एंरडेल आणि रोजमेरी एकत्रित करून लावतात.

मी मेंहदी लावल्यानंतर साधारण तासभर ते वाळवते जोपर्यंत ते पूर्ण कोरडे होत नाही. त्यानंतर आदिवासी तेलात लावते ज्यात मी रोजमेरी आणि एंरडेल तेल एकत्र करून ठेवते. यामुळे मेहंदीमध्ये एक ओलावा टिकून राहतो आणि माझे केस कोरडे होत नाही.
अन्यथा मेंहदीमुळे सहसा केस कोरडे होतात. पण आता केस धुतल्यानंतर ते अगदी सुंदर आणि मऊ होतात. असे त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले.

मेहंदी लावल्यानंतर किती वेळ ते तसेच ठेवावी याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मी अर्धा तास केसांना तेल लावते ते पुरेसे आहे. त्यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो.

हे हॅक खरंच काम करतो का? (But does this hack actually work?)

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबईतील डॉ. शरीफा स्किन केअर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी स्पष्ट करताना सागंतात की, “मेंहदी लावल्यानंतर त्यावर रोजमेरी आणि एंरडेल तेल लावल्यास अधिक फायदे मिळू शकतात हे सिद्ध करणारे मोजके वैज्ञानिक पुरावे आहेत.”

जर तुम्हाला मेंहदीमध्ये तेल एकत्र करायचे असेल तर आधी त्वचारोगतज्ज्ञांना विचारून याची खात्री करा ते तुमच्या केसांसाठी आणि टाळूसाठी योग्य आहे. तुमच्या केसांची आणि टाळूची स्थिती लक्षात घेऊन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या केसांची निगा राखण्याची दिनचर्या असली पाहिजे. मेंहदी केसांवर एक नैसर्गिक आवरण तयार करते आणि केसांची निगा राखते.
पण केसांना मेंहदी लावल्यानंतर त्यावर तेल लावल्याने तुम्हाला जास्तीचा फायदा मिळू शकतो.

पण मेंहदी लावलेल्या केसांना तेल लावून किती वेळ ठेवणे सुरक्षित आहे?

डॉ. चौसे यांच्यामध्ये केसांना लावलेली मेंहदी सुकवल्यानंतर लावलेले तेले किती वेळ ठेवणे योग्य आहे याबाबत वैद्यकियदृष्ट्या कोणतीही शिफारस केलेली नाही कारण मेंहदीच्या फायद्यांप्रमाणे या उपाय फायदेशीर आहे हे सिद्ध करणारे वैज्ञानिक पुरावे नाहीत.

जर तुम्हाला केसांच्या समस्या असतील किंवा जर तुमच्या टाळूला सहज त्रास होत असेल तर मेंहदी वापरण्याबाबत कोणत्याही सुचनांचे पालन करण्याआधी आणि अशा उपायांचा वापर करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे डॉ. शरिफा सुचवतात.

जरी डॉ. मधू चोप्रा यांच्या केसांच्या निगा राखण्याच्या पद्धतीमुळे ऑनलाइन कुतूहल निर्माण झाले असले तरी, तज्ञांच्या मते, केवळ मेंदी लावण्यापेक्षा वाळलेल्या मेंदीवर रोझमेरी आणि एरंडेल तेल लावल्याने केसांमध्ये अधिक ओलावा टिकून राहतो, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. जर तुम्हाला केसांच्या किंवा टाळूच्या समस्या सतत जाणवत असतील, तर त्वचारोग तज्ञाकडून वैयक्तिक सल्ला घेणे उत्तम राहील.