Pudina Detox Tea: उन्हाळ्यात अनेक जण पुदिन्याची चटणी खूप आवडीने खातात. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे तो अनेक प्रकारच्या पेयांमध्येदेखील वापरला जातो. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि शरीर डिटॉक्सदेखील होते. वजन कमी करण्यासाठी आणि सकाळी पोट साफ करण्यासाठी ही पाने खूप उपयुक्त आहेत. उन्हाळ्यात पुदिना खाण्याचे चमत्कारी फायदे जाणून घेऊ…

पुदिन्याची पाने खाण्याचे फायदे

पुदिन्याच्या पानांमध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्ससारखी शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जी हानिकारक रॅडिकल्सना निष्प्रभ करतात.

पुदिन्याची पाने अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. त्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोकादेखील कमी होतो.

पुदिन्यामधील मेंथॉल व कार्व्होन या घटकांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते शरीराला हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत करतात.

पुदिन्यामध्ये असलेले पोषक घटक शरीराला धोकादायक बुरशी आणि यीस्टपासून संरक्षण देण्यासह बळकटी देतात. त्याशिवाय तो बुरशीनाशक प्रभावासाठीही काम करतो.

पुदिन्यामध्ये मेंथॉल, रोझमॊरेनिक अॅसिड व लिन यांसारखी जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे असतात, जी विषाणूंची क्रिया कमी करू शकतात. त्यामुळे संसर्ग रोखण्यासदेखील मदत मिळते.

पोट साफ करण्यासाठी पुदिन्याचा डिटॉक्स चहा पिऊ शकता. हा चहा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हा चहा शरीराला आतून डिटॉक्स करतो आणि अनेक समस्यांपासून वाचवतो. जर तुम्ही सकाळी लवकर उठल्या उठल्या पुदिन्याचा डिटॉक्स चहा प्यायलात, तर पोट सहजपणे साफ होण्यास मदत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुदिन्या चहा बनविण्याचे साहित्य:

  • १/३ कप पुदिन्याची पाने
  • १/२ चमचा ग्रीन टी पावडर
  • १ तुकडा मुलेठी
  • १ लिंबाचा रस
  • २ चमचे मध / साखर
  • १/२ कप पाणी

पुदिन्याचा चहा बनविण्याची कृती:

पुदिन्याचा चहा बनविण्यासाठी पुदिन्याची पाने नीट धुऊन स्वच्छ करा. त्यानंतर भांड्यात पाणी उकळू द्या. नंतर ग्रीन टी घाला. आता त्यात पुदिन्याची ताजी पाने घाला. मंद आचेवर तीन मिनिटे चहा उकळू द्या. आता चहा एका कपामध्ये गाळून घ्या. चहा कोमट झाल्यावर त्यात चवीनुसार मध आणि लिंबाचा रस टाका आणि चमच्याने मिसळा. ताजेपणा आणण्यासाठी त्यात पुदिन्याची पानेदेखील घाला. आता चहाचा आस्वाद घ्या.