Olive Oil In Novel Before Sleeping: आयुर्वेदानुसार, नाभी किंवा बेंबी हा शरीराचा केंद्रबिंदू आहे. तो शरीराच्या अवयवांशी जोडलेला आहे. बंबीला तेल लावणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे आयुर्वेदात सांगितले जाते. झोपण्यापूर्वी बेंबीत तेल सोडल्याने अनेक समस्या दूर होतात. पोटाचे विकार, डोळ्याचे विकार किंवा इतरही संबंधित आजारांवर बेंबीला तेल लावणे ही एक प्रभावी उपचार ठरतो. तर मग जाणून घेऊया बेंबीला तेल लावण्याचे फायदे…
ऑलिव्ह ऑइल
झोपण्यापूर्वी बेंबीला ऑलिव्ह ऑइल लावल्याने हृदयाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बेंबीला तेल लावल्याने कुठलाही आजार बरा होईल असे आयुर्वेद सांगत नाही. मात्र त्याचा दाह काही अंशत: कमी होऊ शकतो. जर तुम्हाला हृदयाच्या समस्या असतील तर अशा गंभीर आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.
कोलेस्ट्रॉल
झोपण्यापूर्वी तुमच्या बेंबीला ऑलिव्ह ऑइलचे दोन थेंब लावल्याने फायदा होऊ शकतो. बेंबीला तेल लावल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच जर तुम्हाला दीर्घकालीन कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणेच औषधोपचार घ्या.
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई असते. ते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. बेंबीला ऑलिव्ह ऑइल लावल्याने तुमची त्वचा उजळण्यास मदत होते. बेंबीला ऑलिव्ह ऑइल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा देखील कमी होतो.
केवळ ऑलिव्ह ऑइलच नाही, तर इतरही तेल किंवा तूपाचा वापर बेंबीला लावण्यासाठी केला जातो. डोळ्यांच्या विकारांवर देशी तूप आणि तेल एकत्रितपणे लावण्याचा सल्ला आयुर्वेदानुसार दिला जातो.

