Ghee In Nostrils: भारताने जगाला दिलेले आयुर्वेदरूपी वरदान हे उपचारापेक्षा प्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित करते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच जंतू, घातक घटक शरीराबाहेर टाकणे हा संसर्ग टाळण्याचा आणि निरोगी राहण्याचा एक सर्वात सोपा मार्ग आहे. संसर्ग आणि जुनाट आजारांना दूर ठेवण्यासाठी आज आपण घरगुती तुपाचा कसा वापर करता येईल हे पाहूया. तूप हे अधिक कॅलरीजयुक्त असल्याचे म्हणत अनेकदा वजन किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुपाचा वापर टाळावा असे सांगितले जाते पण तुम्हाला माहित आहे, तूप केवळ सेवनातूनच नव्हे तर अन्यही मार्गाने वापरता येते व त्याचे फायदेही अनेक आहेत. आयुर्वेदात नासिकेवाटे तूप शरीरामध्ये प्रवेश करून कशी मदत करू शकते हे सांगितले आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
आयुर्वेदाच्या माहितीनुसार रात्री झोपता नाकपुड्यात गाईचे तूप टाकणे ही सर्वात सोपी डिटॉक्स पद्धती आहे. दररोज सकाळी किंवा रात्री तुपाचे फक्त काही थेंब नाकात घातल्याने तुमची रोग प्रतिकारशक्ती सुधारू शकते, इतकेच नाही तर निद्रानाश समस्या आणि मानसिक ताण-तणाव अशा त्रासांवर सुद्धा तुम्ही मात करू शकता.
आपल्याला माहीतच आहे की अलीकडे प्रदूषण वाढत आहे आणि येत्या काळात सण व उत्सव असल्याने अधिक वायू प्रदूषण होण्याची शक्यता आहे. प्रदूषित हवेत शिसे आणि पारा यांसारख्या धातू आढळतात. जे शरीरात विषारी द्रव्यांचा संचय रोखण्यासाठी तूप या परिस्थितीत तुमची मदत करू शकते. तुमच्या नाकाच्या पडद्याच्या आतील बाजूस तूप लावल्याने हवेतील विषारी घटक नाकावाटे शरीरात जाणेच थांबते, यामुळे पुढे येणाऱ्या समस्या सुद्धा कमी होतात. याला आयुर्वेदात याला ‘नास्य कर्म’ म्हणतात.
नाकात तूप घालण्याचे फायदे
आयुर्वेदिक डॉ. दीक्षा भावसार यांनी आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, नास्य कर्म केल्याने खालील फायदे होऊ शकतात.
१) डोकेदुखी (तणाव, मायग्रेन इत्यादीमुळे) पासून सुटका
२) तुमची प्रतिकारशक्ती सुधारते,
३) ऍलर्जीचा त्रास कमी होतो
४) स्मरणशक्ती सुधारते,
५) मानसिक आरोग्य सुधारते
६) केस गळणे आणि पांढरे होणे अशा त्रासातून मुक्ती
७) तणाव कमी होतो
८) तुमची एकाग्रता सुधारते
हे ही वाचा<< White Or Whole Wheat Bread: ब्रेड खायची इच्छा होतेय? बिनधास्त खा, पण निवडताना ‘ही’ माहिती तपासा
नाकात तूप किती व कसे घालावे?
आयुर्वेद तज्ञ म्हणतात की जर एखाद्याला वारंवार तणाव जाणवत असेल, वारंवार डोकेदुखी होत असेल, शरीरात जास्त उष्णता असेल, कामे करण्यासाठी मानसिक इच्छा होत नसेल, केसांची समस्या असेल, दृष्टी मंद होत असेल, श्रवण मंद होत असेल, निद्रानाश किंवा अस्वस्थ झोप असेल तर झोपेच्या वेळी तुपाचे दोन थेंब नाकात घालणे फायदेशीर ठरू शकते. थेरपीसाठी तूप द्रव स्वरूपात आणि कोमट असले पाहिजे आणि ते कापूस, ड्रॉपर किंवा लहान बोटाच्या मदतीने लावले पाहिजे.