चायनीज म्हणजे अनेकांचा आवडता पदार्थ. घरात जर स्पेशल जेवण बनवायचं असेल किंवा काही रोजच्या जेवणापेक्षा वेगळं खायचा बेत असेल तर आपल्या डोक्यात सर्वात प्रथम येतं ते म्हणजे चायनीज. पण चायनीज खायचं म्हटलं तर ते बाहेरुन ऑर्डर करणं याकडे अनेकांचा कल असतो. पण चायनीज घरच्या घरी खरुन खाणंही आता सहज शक्य आहे. काही जणांना चायनीज बनवणं खूप कठीण वाटतं. पण तसं नाही. बाजारातही चायनीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध आहे. त्यामुळे घरी चायनीज पदार्थ बनवून अस्सल हॉटेलचा स्वाद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात झटपट 30 मिनिटांत करता येतील असे चायनीज पदार्थ!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1) एग गार्लिक फ्राइड राईस :

फ्राइड राईस बनवताना एका कढईत तुम्ही कांद्याची पात आणि त्यात काही भाज्या घालून छान परतून घ्या. त्यात अंड्याचे मिश्रण घालावे. यानंतर चायनिज राईसचा स्वाद वाढवण्यासाठी यात सोया सॉस, लसूण, अद्रक आणि फ्राइड राईस मसाला टाकावा. व थोडा वेळ शिजवून घ्यावा. यानंतर यात शिजवलेला भात टाकून छान एकजीव करून घ्या आणि काही मिनिटं वाफ येऊन द्या. तर अश्या रीतीने गरमागरम आणि झटपट ‘एग गार्लिक फ्राइड राईस’ खाण्यासाठी तयार आहे!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quick and easy chinese recipes you can rustle in 30 minutes scsm
First published on: 30-06-2021 at 14:15 IST