आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकालाच्या तारखेची प्रतीक्षा संपली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड जानेवारी २०२२ मध्ये आरआरबी एनटीपीसी स्टेज १ चा निकाल जाहीर करेल. बोर्डाने ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in निकालाच्या तारखेसंदर्भात महत्त्वाची सूचना अपलोड केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी) त्यांच्या अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर रेल्वेमधील गैर-तांत्रिक श्रेणी भरतीसाठी स्टेज-१ परीक्षा निकाल जाहीर करणार आहे. या व्यतिरिक्त, उमेदवार आरआरबीच्या प्रादेशिक वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे भर्ती बोर्ड (आरआरबी) १५ जानेवारी २०२२ पर्यंत पहिल्या संगणक-आधारित चाचणी (सीबीटी) २०२०-२१ चा एनटीपीसी निकाल जाहीर करेल. पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी-१) चा निकाल सध्या प्रक्रियेत आहे आणि निकाल १५ जानेवारी २०२२ पर्यंत आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.”, अशी अधिकृत सूचना देण्यात आली आहे. आरआरबी एनटीपीसी स्टेज-१ संगणक आधारित चाचणी २८ डिसेंबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत ७ टप्प्यांत घेण्यात आली.

आरआरबी एनटीपीसी सीबीटी स्टेज १ चा निकाल कसा पाहाल?

  • आरआरबीच्या प्रादेशिक अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा
  • होमपेजवर “NTPC CBT 1 निकाल 2020” वर क्लिक करा
  • तुमची क्रेडेन्शियल आणि इतर तपशील भरा
  • सबमिटवर क्लिक करा
  • तुमचा आरआरबी एनटीपीसी सीबीआर-१ चा निकाल तुम्हाला दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढा

सीबीटी-१ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना सीबीटी-२ ची परीक्षा द्यावी लागेल. १४ ते १८ फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षा होणार आहे. आरआरबीने स्पष्ट केले आहे की, कोविड-१९ ची परिस्थिती पाहता, परीक्षा सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील. एनटीपीसीच्या एकूण ३५,२८१ रिक्त जागा भरती मोहिमेद्वारे रेल्वेमध्ये भरल्या जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी २५ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway rrb ntpc cbt result 2020 21 date declare rmt
First published on: 06-12-2021 at 10:28 IST