scorecardresearch

अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट; सांगितले, “हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा नाहीतर…”

hair transplant tips: हेअर ट्रांसप्लांट करताना, लक्षात घ्या की तुम्ही जेथे ट्रांसप्लांट करत आहात, तेथे योग्य क्रिटिकल हेअर टीम आहे की नाही.

अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट; सांगितले, “हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा नाहीतर…”
photo(jansatta)

Rajpal yadav undergoes hair transplant: वाढते प्रदूषण, ताणतणाव, बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर केसांवरही होताना दिसत आहे. खराब आहार आणि रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केस गळण्याची समस्या लोकांना खूप सतावत आहे. तरुण वयातही लोक टक्कल पडण्याचे बळी ठरत आहेत. या समस्येमुळे सिलेब्रिटी खूप प्रभावित होत आहेत. स्वतःला सुंदर दिसण्यासाठी आणि टक्कल दूर करण्यासाठी काही सेलिब्रिटी हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब करत आहेत.

अलीकडेच विनोदी प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवनेही टक्कल दूर करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब केला आहे. केस ट्रान्सप्लांट ही टक्कलची समस्या दूर करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया आहे. या ट्रान्सप्लांटमध्ये, प्लास्टिक सर्जन किंवा डर्मेटोलॉजिकल सर्जन डोक्यावर टक्कल पडलेल्या जागेवर केस ठेवतात. सर्जन हे केस डोक्याच्या मागच्या बाजूचे किंवा साईडचे असलेले केस घेऊन टक्कल पडलेल्या जागी ठेवतात. अलीकडेच, राजपाल यादवने हेअर ट्रान्सप्लांट केले आहे आणि त्याचा अनुभव शेअर करताना त्याने या प्रक्रियेदरम्यान काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हेअर ट्रान्सप्लांट कसे केले जाते आणि यादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

( हे ही वाचा: दोन प्रकारचे पदार्थ किडनीवर विषाप्रमाणे परिणाम करतात, किडनी निरोगी कशी ठेवावी जाणून घ्या…)

हेअर ट्रान्सप्लांट कसे केले जाते? ( How hair transplant is done)

केस ट्रान्सप्लांट हे एक तंत्र आहे ज्यामध्ये फॉलिकल्स मिळविण्यासाठी दोन मुख्य तंत्रे वापरली जातात. एक म्हणजे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट (FUT) आणि दुसरे म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE).

फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन (FUT): follicular unit transplantation)

फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशनमध्ये, डोक्याच्या मागील बाजूस त्वचेची पट्टी कापण्यासाठी स्केलपेलचा वापर केला जातो. पट्टी लावण्यासाठी अनेक इंच लांब एक चीरा बनविला जातो. नंतर हा कट टाके घालून बंद केला जातो. त्यानंतर सर्जन डोकेचा काढलेला भाग लॅन्सेट आणि सर्जिकल चाकू वापरून लहान तुकड्यांमध्ये वेगळे करतात. केसांचे ट्रान्सप्लांट केल्यावर, हे वेगवेगळे भाग नैसर्गिक दिसणारे केस वाढवण्यासाठी वापरले जातात. या दरम्यान, आपले डोके पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर, सर्जन ही प्रक्रिया सुरू करतात.

फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE)

फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन (FUE) मध्ये, केसांचे कूप डोक्याच्या मागील भागातून किंवा ज्या भागात जास्त प्रमाणात केस असतात, अनेक लहान पंक्चर किंवा चीरे द्वारे काढले जातात. ज्या भागात केस ट्रान्सप्लांट केले जात आहेत त्या भागात तज्ञ सुईने लहान छिद्र करतात, ज्यामध्ये मुंगी चावल्यासारखे वेदना जाणवते. या छिद्रांमध्ये केस घातले जातात. या प्रक्रियेचा वापर करून, शल्यचिकित्सक टाळूवर शेकडो किंवा हजारो केसांचे ट्रान्सप्लांट करतात. ट्रान्सप्लांट नंतर, डोके मलमपट्टीद्वारे काही दिवस झाकले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला ४ ते ५ तास लागतात. केस ट्रान्सप्लांट नंतर १० दिवसांनी डोक्यावरील टाके काढले जातात.

( हे ही वाचा: केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश)

केस ट्रान्सप्लांट करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी (Things to keep in mind while getting hair transplant)

  • हेअर ट्रान्सप्लांट करताना काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला अभिनेता राजपाल यादवने दिला आहे. ज्या ठिकाणी तुमचे केस ट्रान्सप्लांट केले जात आहे तेथे योग्य क्रिटिकल हेअर टीम आहे की नाही याची पडताळणी करा, असे ते म्हणाले.
  • केस ट्रान्सप्लांट करताना, फक्त योग्य डॉक्टर निवडा. असे डॉक्टर निवडा ज्याच्याजवळ लायसेन्स आहे.
  • केस ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी, त्या तंत्राची संपूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला होणाऱ्या त्रास आणि वेदनांची कल्पना येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:56 IST

संबंधित बातम्या