लोकप्रिय विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे काल २१ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने फिल्म इंडिस्ट्रीमध्ये दुखाचे वातावरण आहे. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ४० दिवसानंतर काल त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांच्या शवविच्छेदनाविषयी एक माहिती समोर आली आहे. कुठलीही चिरफाड न करता राजू यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू श्रीवास्तव यांची व्हर्च्युअल ऑटोप्सी करण्यात आली आहे. व्हर्च्युअल ऑटोप्सी हे सामान्य शवविच्छेदनापेक्षा वेगळे आहे. यामध्ये शरीराची चिरफाड होत नाही. मशिनांद्वारे स्कॅनिंग करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. विशेष म्हणजे, हे शवविच्छेदन करण्यासाठी केवळ काही मिनिटांचाच वेळ लागतो. राजू यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

(१२ आठवड्यांत कमी होऊ शकते ६ किलो वजन, केवळ ‘हे’ नियम पाळावे लागतील)

कसे होते व्हर्च्युएल ऑटोप्सी

व्हर्च्युअल ऑटोप्सीला व्हर्टोप्सी देखील म्हटले जाते. यात मृतदेहाची पूर्ण तपासणी मशीनद्वारे होते. यामध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआई मशीनचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे ही व्हर्च्युअल ऑटोप्सी वेळ कमी घेते आणि व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांचा चांगला अंदाज मिळतो. तसेच या शवविच्छेदन प्रक्रियेत कुठली चीरफाड करण्यात येत नाही.

व्यायाम करत असताना आला हृदयविकाराचा झटका

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना त्यांना १० ऑगस्टला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने ‘एम्स’ रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र ते शुद्धीवर आले नव्हते. श्रीवास्तव यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेनेही त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shrivastav virtual autopsy take place ssb
First published on: 22-09-2022 at 09:22 IST