Raksha Bandhan 2022 how to decorate thali 5 must things to prepare for rakhi pooja thali | Loksatta

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनासाठी अशी सजवा राखीची थाळी; ‘या’ वस्तू चुकूनही विसरू नका

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा होणारा सण, भाऊ बहिणीच्या नात्याचा हक्काचा दिवस म्हणजे रक्षाबंधन.

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनासाठी अशी सजवा राखीची थाळी; ‘या’ वस्तू चुकूनही विसरू नका
रक्षाबंधन थाळी (फोटो: जनसत्ता)

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा होणारा सण, भाऊ बहिणीच्या नात्याचा हक्काचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी रक्षाबंधनाचा सण गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ च्या संध्याकाळपासून सुरू होईल आणि तिथीनुसार शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ च्या सकाळपर्यंत रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे. रक्षाबंधनाच्या सणाला बहीण भावाला ओवाळते व त्याच्या मनगटावर राखी बांधते. आजच्या लेखात आपण रक्षाबंधनाच्या थाळीची सजावट कशी करावी हे जाणून घेणार आहोत.

दरवर्षी आपण सण म्हंटले की कपड्यांपासून, हेअरस्टाईल, गिफ्ट अशी सगळी तयारी आधीच करून ठेवतो पण नेमकं ओवाळणीच्या वेळी हे राहिलं, ते आणलंच नाही असा एकच गोंधळ होतो. यामुळे होणारी धावाधाव टाळण्यासाठी रक्षाबंधनात लागणाऱ्या वस्तूंची यादी आपण जाणून घेऊयात..

ओवाळणीच्या थाळीत कोणत्या गोष्टी असाव्यात?

राखी

अर्थात, रक्षाबंधनासाठी तयार करायच्या थाळीत राखी असायलाच हवी. शक्यतो ही राखी पॅकेट मधून काढून ठेवा जेणेकरून आयत्या वेळी तुमचा त्यावरचं प्लॅस्टिक काढण्यात जाणार नाही.

कुंकू

ओवळीणीत भावाच्या कपाळावर टिळा लावला जातो. यासाठी ओवाळणीच्या ताटात कुंकू असावं. शक्यतो पुरुषांच्या कपाळावर हळद लावत नाहीत त्यामुळे केवळ कुंकू असेल तरी पुरेसे आहे.

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन सह जोडून येतेय मोठी सुट्टी! ‘या’ ठिकाणी करता येईल बजेट ट्रिप

तांदूळ

टिळा लावल्यावर त्यावर तांदूळ लावण्याची सुद्धा पद्धत आहे. असं म्हणतात ज्या बहिणीचे जितके तांदूळ भावाच्या कपाळावर राहतात तितकं अधिक त्या नात्यात प्रेम असतं. त्यामुळे टिळा लावण्याआधी तेलाचे बोट वापरावे असे सांगितले जाते.

ओवाळणीसाठी निरंजन

रक्षाबंधनाच्या थाळीत निरंजन व फुलवात असावी. साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल.

Sister’s Day: भारतात या दिवशी साजरा होतो सिस्टर डे, रक्षाबंधनाच्या आधीच बहिणाबाईला असं करा खुश

मिठाई

भावाचं तोंड गोड करण्यासाठी आपल्याला थाळीत मिठाई ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही बनवलेली एखादी गोडाची रेसिपी सुद्धा तुम्ही भावाला खाऊ घालू शकता.

याशिवाय काही प्रांतात थाळीत नारळ सुद्धा ठेवायची पद्धत आहे. हा नारळ ओवाळणीच्या वेळी भावाच्या हातात दिला जातो. या पाच वस्तू तुमच्या ओवाळणीच्या थाळीत नक्की असाव्यात आणि या व्यतिरिक्त ओवाळणीसाठी म्हणजेच गिफ्ट्स साठी थोडी रिकामी जागा सुद्धा ठेवायला विसरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरोग्यवार्ता : भूक आणि रागाचा संबंध संशोधनाने सिद्ध!

संबंधित बातम्या

Kitchen Tips: स्वयंपाकघरातील करपलेली भांडी लगेच होतील स्वच्छ; फक्त वापरा या सोप्या टिप्स
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय
‘Panasonic Eluga I2 Active’ लाँच, किंमत *, *९०/-
जागतिक एड्स दिन २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि एड्स आजाराविषयी गैरसमज
जागतिक नौदल दिन २०२१: भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबरला का साजरा केला जातो?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
‘चला कर्नाटक पाहू’ नागपूर विमानस्थळाबाहेरील बॅनर्स शिवसैनिकांनी फाडले; ठाकरे गट आक्रमक
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिलजीत दोसांझचं मोठं विधान; म्हणाला “सरकारचा नालायकपणा…”
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची निवड; प्रक्रिया न राबविता घोषणा केल्याचा आरोप