Raksha Bandhan Gift For Brother : येत्या १९ ऑगस्ट रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहि‍णीचे रक्षण करण्याचे वचन देतो. हा दिवस बहीण भावाच्या नात्यातील गोडवा जपणार असतो.

बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. ते एकमेकांबरोबर भांडतात पण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. बहीण नेहमी भावाला हक्काने गिफ्ट मागते पण भावाला गिफ्ट काय द्यावं, हा प्रश्न नेहमी प्रत्येक बहि‍णीला पडतो पण बहिणींनो, टेन्शन घेऊ नका कारण आज आपण भावासाठी काही हटके गिफ्ट जाणून घेणार आहोत.

१. 3D LED लॅम्प

तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या भावाला 3D LED लॅम्प देऊ शकता. या लॅम्पमध्ये तुम्ही त्यांचा फोटो, नाव, बहीण भावाचा फोटो, एखादी आवडती गोष्ट वेगवेगळ्या डिझाइन मध्ये दाखवू शकता. हा लॅम्प अतिशय हटके आणि आकर्षक दिसतो.

२. रक्षाबंधन हॅम्पर

तुम्ही भावाच्या सर्व आवडत्या गोष्टी एकत्रित करून त्याला हॅम्पर देऊ शकता. यात त्याला आवडणार्‍या चॉकलेट व वस्तूंचा समावेश करा.

हेही : Vinesh Phogat प्रमाणे रात्रभर २ ते ३ किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? आरोग्यतज्ज्ञांचे उत्तर वाचाच….

३. शेव्हिंग किट

मुलांना सर्वात जास्त उपयोगी पडणारी वस्तू म्हणजे शेव्हिंग किट. प्रत्येक मुलाच्या बॅगमध्ये शेव्हिंग किट असते. तुम्ही तुमच्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी शेव्हिंग किट गिफ्ट देऊ शकता. या शेव्हिंग किटमध्ये शेव्हिंग क्रिम, शेव्हिंग रेझर, शेव्हिंग ब्रश, जास्तीच्या ब्लेड, शेव्हिंग केल्यानंतरचा बाम आणि टॅव्हल पाऊच इत्यादी वस्तू असतात.

४. लेदर बॅग

जर तुमचा भाऊ नियमित ऑफिस किंवा कॉलेजामध्ये जात असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी रक्षाबंधनालाच लेदर बॅग गिफ्ट म्हणून घेऊ शकता.

५. टिफीन बॉक्स किंवा पाण्याची बाटली

तुम्ही रक्षाबंधनला त्याला टिफीन बॉक्स व पाण्याची बाटली गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुमचे हे गिफ्ट त्याच्यासाठी अत्यंत उपयोगाचे ठरू शकते याशिवाय दररोज टिफीन बॉक्स व पाण्याची बाटली पाहिल्यावर त्यांना तुमची नियमित आठवण सुद्धा येईल.

हेही : Dinner & Breakfast Timing : रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता कधी करावा? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

६. जिम मेंबरशिप

मुलांमध्ये जिमचे खूप वेड असते. अशात जर तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या भावाला जिम मेंबरशिप खरेदी करून दिली तर त्याचा आनंद गगनात मावेनासा राहील.