Raksha Bandhan Wishes 2026: बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण-भावाचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात जन्मापासूनच प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर कितीही भांडले, तरी तितकंच हक्कही गाजवतात आणि प्रेमही करतात. कधी रूसतात पण एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. बहीण ही दुसरी आई असते आणि भाऊ हा घरात वडिलांच्या जागी असतात. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. एकमेकांसाठी इतरांबरोबर भांडतात, पण एकमेकांना कधीही एकटं सोडू शकत नाही.

या पवित्र अशा रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि बहीण तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या बहीणीला किंवा भावाला काही छान, हटके आणि प्रेमळ शुभेच्छा पाठवू शकता. तर मग वाचा तुम्ही मेसेजद्वारे किंवा स्टेटसद्वारे कसे विविध प्रकारच्या शुभेच्छा पाठवू शकता…

“तू नेहमी माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत होतीस. आज मी तुला आशीर्वाद देतो की तुझं जीवन यशस्वी होवो. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, बहिणी!”

भावा-बहिणीचं बंधन म्हणजे प्रेमाचा पूल, सुखाला पडो मायेची भूल बहिणीच्या प्रेमाचं, भावाच्या आदराचं पर्व,
आनंदाने साजरा करा रक्षाबंधन सर्व…

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं ते अतूट असं बंधन आहे…
हळव्या नात्याच्या धाग्यावर उमलणारं,
अलवार स्पंदन आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राखीच्या धाग्यात बांधले गेले
जन्मजन्माचे भाऊ बहिणीचे
प्रेमळ नाते, या नात्यातील
प्रेम बहरत राहो कायमचे
राखी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा !

मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

बहीण म्हणजे दुसरी आई
जगावेगळी माझी ताई
ती माझी सावली
आणि माझ्या आयुष्यातली खरी माऊली
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

“रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण, बहीण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण! रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

“बंध हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा… बांधला गेलाय एका राखीमध्ये. माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“कधी भांडलो, कधी हसलो, कधी रुसलो, पण एकत्र असल्यावरच झालो खरे सुखी… रक्षाबंधनाच्या दिवशी, हे नातं आणखी घट्ट होवो… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

कधी खोडकर भांडण, तर कधी मायेची थाप, देवाने जुळवली आपली ही जगावेगळी छाप.परिस्थिती कशीही असो, घट्ट राहू दे ही गाठ,जन्मोजन्मी सोबत राहो आपली हीच सुंदर वाट.रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

​”कधी नकळत झालेला रुसवा, तर कधी पाठीवर मारलेली मायेची थाप… या नात्याला कोणत्याही उपमेची किंवा शब्दांची गरजच नाही… हे अथांग प्रेम असंच जन्मोजन्मी टिकून राहो… रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!”

राखी बांधून हातात बहीण ओवाळे भावाला,
भरून साखर तोंडात भाऊ जीव लावे बहिणीला,
बहिण-भावाच्या प्रेमाचा झरा असाच वाहत राहो,
दोघांच्या या नात्याला दीर्घायुष्य लाभो…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!