रमा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, रमा एकादशीला श्रीविष्णूचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते.

lifestyle
रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबतच ऐश्वर्य आणि वैभवाची देवी लक्ष्मीचीही विधिवत पूजा केली जाते. (photo: file)

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला रमा एकादशी म्हणतात. यंदा रमा एकादशीचे व्रत सोमवार, १ नोव्हेंबर रोजी आहे. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबतच ऐश्वर्य आणि वैभवाची देवी लक्ष्मीचीही विधिवत पूजा केली जाते. यानंतर दिवाळीचा सण येतो. दिवाळीपूर्वी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रमा एकादशी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मीला रमा देखील म्हणतात, कार्तिक एकादशीला भगवान विष्णूंसोबत रमाचीही पूजा केली जाते, म्हणून याला रमा एकादशी म्हणतात.

रमा एकादशी २०२१ तारीख

पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२७ पासून सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी, ०१ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२१ पर्यंत आहे. तसेच भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने रमा एकादशीचे व्रताचरण सोमवार, १ नोव्हेंबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते.

रमा एकादशी २०२१ मुहूर्त

०१ नोव्हेंबरचा इंद्र योग रात्री ९:०५ पर्यंत आहे. अशा स्थितीत यंदा इंद्रयोगात रमा एकादशीचे व्रत ठेवण्यात येत आहे. इंद्र योग शुभ कार्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी राहुकाल सकाळी ०७:५६ ते ०९:१९ पर्यंत आहे. राहुकाल पूजा आणि शुभ कार्यासाठी वर्ज्य मानले जाते. अशा स्थितीत तुम्ही रमा एकादशीला राहुकाल सोडून दिवसभरात कोणत्याही वेळी पूजा करू शकता.

रमा एकादशीचे महत्त्व

वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, रमा एकादशीला श्रीविष्णूचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. हिंदू धर्मात रमा एकादशीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जे लोकं रमा एकादशीचे व्रत करतात आणि भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा करतात. त्यांच्या घरातील दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होते. घरातील सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होते. भगवान विष्णूच्या कृपेने मोक्षही प्राप्त होतो. असे सांगितले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rama ekadashi know date tithi puja muhurat indra yoga and importance scsm

ताज्या बातम्या