वेगाने वजन कमी करण्याच्या नादात वाढू शकते यूरिक एसिडची पातळी, यासाठी ‘या’ पद्धतीचा करा अवलंब

वजन कमी करण्यासाठी अनेक वेळा लोकं अशा पद्धतीचा अवलंब करतात ज्याद्वारे वजन खूप वेगाने कमी होते.

lifestyle
व्यायामाबरोबरच नियमित योगा करणे देखील वजन कमी करण्यासाठी मदत करतात. (photo : freepik)

वजन कमी करण्यासाठी अनेक वेळा लोकं अशा पद्धतीचा अवलंब करतात ज्याद्वारे वजन खूप वेगाने कमी होते. तर यासाठी काही लोकं दीर्घकाळ उपाशी राहण्याची पद्धत अवलंबतात, जे खूप हानिकारक ठरू शकते. याने बराच काळ उपाशी राहून वजन कमी केल्याने यूरिक एसिडची पातळी अधिक वेगाने वाढते, ज्यामुळे नंतर तुमच्या शरीरात गाठी तयार होऊ शकतात आणि किडनीच्या समस्या निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊयात अति वेगाने वजन कमी करण्याचे तोटे काय आहेत आणि कोणत्या योग्य पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकतात.

जलद वजन कमी करण्याचे तोटे

तुम्ही जर अचानक जास्त वजन कमी केल्याने डिहायड्रेशन, हाडांचे आजार, नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एक्सपर्ट यांच्या मते तुम्ही अति वेगाने वजन कमी केले तर त्याचा तुमच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो. यात तुम्ही वजन कमी करण्याच्या नादात तुमच्या शरीरातील स्नायूंचे तीन पटीने नुकसान होते. तसेच जलद वजन कमी करण्यासाठी तुम्ही आवश्यक पोषक तत्वे कमी होतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही आणि तुम्ही दिवसभर थकलेले आणि कमकुवत राहतात.

वजन कमी करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिनक्रम पाळा आणि एका महिन्यात तीन ते चार किलो वजन कमी करण्यास सुरुवात करा. वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. यात तुमच्या जेवणाची वेळ निश्चित करा आणि आहारामध्ये प्रत्येक आवश्यक पोषक घटकांचा समावेश करा. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा आणि पॅक केलेले अन्नपदार्थ कमीत कमी खा.

वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स

कार्बोहायड्रेटची मात्रा कमी करा

तुमच्या आहारातील अन्नामध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा जास्त प्रमाणात ठेवतात आणि कमी प्रमाणात प्रथिने सेवन करतात. हेच वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. यासाठी आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करा आणि अंडी, डाळी, सोयाबीन, राजमा यांसारख्या प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

फायबरचे सेवन वाढवा

फायबरने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरून राहिल्याने तुम्हाला भूक कमी लागते. तसेच अन्न व्यवस्थित पचवण्याचे काम करते. त्यामुळे रताळे, सफरचंद, बीन्स इत्यादींचा आहारामध्ये समावेश करा.

खूप पाणी प्या

सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबाचे काही थेंब टाकून पाणी प्या. दिवसभरात सुमारे ८ ते १० ग्लास पाणी प्या. यामुळे तुम्हाला डिहाइड्रेशन होणार नाही आणि वजन कमी करण्यास मदत होईल. पण हे लक्षात ठेवा की, जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवणापूर्वी थोडेसे पाणी प्या आणि जेवल्यानंतर तासाभराने पुन्हा पाणी प्या.

नियमितपणे योगा करा

व्यायामाबरोबरच नियमित योगा करणे देखील वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. योगामुळे मन शांत होते आणि तुम्ही एकाग्र होऊन तुमचे काम योग्य पद्धतीने करू शकतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rapid weight loss may cause high uric acid level use these tips to weight loss in a healthy way scsm

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या