Rashi 2021: सूर्य-मंगळ-केतु एकत्र आल्याने त्रिग्रही योग; पुढचे १० दिवस ‘या’ दोन राशींच्या लोकांनी जरा सांभाळून

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह, नक्षत्र यांच्या परिवर्तनानंतर जीवनावर परिणाम जाणवत असतो.

horoscope_2-1200-1
Rashi 2021: सूर्य-मंगळ-केतु एकत्र आल्याने त्रिग्रही योग; पुढचे १० दिवस 'या' दोन राशींच्या लोकांनी जरा सांभाळून

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह, नक्षत्र यांच्या परिवर्तनानंतर जीवनावर परिणाम जाणवत असतो. आता ग्रहांचे सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाआहे. या राशीत सूर्य आणि केतू आधीपासूनच विराजमान आहेत. वृश्चिक राशीत मंगळ, सूर्य आणि केतु यांची युती झाल्याने त्रिग्रही योग बनला आहे. हा योग १६ डिसेंबरपर्यंत सूर्य धनू राशीत प्रवेश करेपर्यंत असणार आहे. त्यामुळे काही राशींवर याचे परिणाम दिसून येणार आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये या योगामुळे उग्रता दिसून येईल. तर त्रिग्रही योग असल्याने मेष आणि धनू राशीच्या लोकांना पुढचे दहा दिवस सांभाळून राहण्याच्या सल्ला दिला जात आहे.

 • मेष- मेष राशीच्या अष्टम भावात या ग्रहांची युती चांगली नाही. कामाच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वाद विवाद आणि कोर्टाच्या प्रकरणापासून दूर राहिलं पाहीजे.
 • वृषभ-वृषभ राशीच्या सप्तम भावात त्रिग्रही योग असल्याने यशाची नवी दारं उघडतील. मात्र वैवाहिक जीवनात कलह होण्याची शक्यता आहे. या दरम्यान योजना गोपनीय ठेवल्यास चांगलं राहील.
 • मिथुन- मिथुन राशीच्या सहाव्या भावात मंगळ, सूर्य आणि केतु विराजमान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ चांगला जाईल. या दिवसात चांगला फायदा होईल. मात्र पैसे उधार देणं आणि दुर्घटना यापासून सावध राहीलं पाहीजे.
 • कर्क- कर्क राशीच्या पंचम भावात त्रिग्रही योग आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाईल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नोकरीत नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
 • सिंह- सिंह राशीच्या चतुर्थ भावात त्रिग्रही योग असल्याने अप्रत्यक्ष काही लाभ होण्याची शक्यता आहे. जमीनीशी निगडीत काही व्यवहार होतील. तर नोकरी आणि व्यवसायाशी निगडीत बाबी चांगल्या असतील.
 • कन्या- कन्या राशीच्या तृतीय भावात त्रिग्रही योग असल्याने शुभ आहे. चांगल्या योजना आखत्या येतील. योजना गोपनीय ठेवून त्यात यश मिळवता येईल. आध्यात्मात रूची वाढेल.

Numerology 2022: तुमची जन्मतारीख ‘ही’ असेल तर २०२२ तुम्हाला ठरेल लकी!

 • तूळ- तूळ राशीच्या द्वितीय भावात त्रिग्रही योग असल्याने अप्रत्यक्ष काही फायदे होतील. वडिलांच्या संपत्ती आणि जमीनीशी निगडीत निर्णय आपल्या बाजूने येतील. बाहेरच्या लोकांवर डोळे बंद ठेवून विश्वास करू नका.
 • वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग चढ-उताराचा असणार आहे. तर दुकान आणि घराची कार्य करण्यास शुभ वेळ असणार आहे. रोजगाराशी निगडीत प्रकरणांमध्ये यश मिळेल.
 • धनु- धनु राशीच्या बाराव्या भावात त्रिग्रही योग असल्याने थोडं सांभाळून राहावं लागेल. स्वभावात चिडचिड वाढू शकते. काही अशुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे.
 • मकर- मकर राशीपासून अकराव्या भावात त्रिग्रही योग असल्याने लाभ होईल. भाऊ बहिणीकडून सहकार्य मिळेल. उधार दिलेलं पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही चिंता दूर होतील.
 • कुंभ- कुंभ राशीच्या दशम भावात त्रिग्रही योग तयार होत असल्याने पालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढू शकते. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतात. पद-प्रतिष्ठा वाढेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.
 • मीन- मीन राशीच्या नवव्या भावात तयार होत असलेला त्रिग्रही योग संमिश्र परिणाम देईल. नोकरीत पदोन्नती व सन्मान वाढेल. रोजगाराच्या संधी वाढतील. तथापि, काही चिंता आणि अडचणी देखील तुमच्या मार्गात येतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashi 2021 trigrahi yoga due to sun mars ketu coming together rmt

ताज्या बातम्या