सरकारने दिलेल्या निर्देशानुसार रेशन कार्डला आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकार आता रेशन कार्डाशी आधार लिंक करण्यावर योजनांचा लाभ देत आहे. जर तुम्ही देखील या योजनेपासून वंचित असाल आणि तुमचे रेशन कार्ड आधारशी जोडलेले नसेल, तर तुम्ही या स्टेप फॉलो करून तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक करू शकता.

केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये रेशन कार्ड ग्राहकांना लाभ मिळत आहे.रेशन कार्डाशी आधार लिंक केल्यावर, दिल्ली, यूपी, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये मोफत रेशन दिले जात आहे. यासह, आधार कार्ड आपल्याकडे नसले तरीही रेशन देण्यात येत आहे. तुम्ही आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा लाभ घेऊ शकता. यासह, आपण देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून रेशन मिळवू शकता.

Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
13 Development Centers along Konkan Expressway, Sea Route
कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे; १०५ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

अशा प्रकारे आधार कार्ड ऑनलाईन लिंक करा

१. सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

२. आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करून पुढे जा.

३. आता इथे तुम्हाला तुमचा पत्ता जिल्हा राज्यासह भरावा लागेल.

४. यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.

५. आता इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरा.

६. ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

७. ओटीपी प्रविष्ट करताच, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

८. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे आधार पडताळले जाईल आणि तुमचे आधार तुमच्या रेशन कार्डाशी जोडले जाईल.

ऑफलाइन लिंक देखील करू शकता

जर तुम्हाला रेशन कार्डला आधारशी लिंक करायचे असेल तर तुम्ही आधार कार्डची एक प्रत, रेशन कार्डची एक प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो केंद्राकडे जमा करू शकता. या व्यतिरिक्त, आपण कंत्राटदाराशी देखील संपर्क साधू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला केंद्राच्या योजनांची माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही केंद्राकडून त्याच्याशी संबंधित माहितीही मिळवू शकता.