scorecardresearch

बदाम भिजवून खाल्याने खरोखरच फायदा होतो की ही केवळ अफवा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..

बदाम भिजवून खाल्ल्याने आरोग्याला भरपूर फायदा होतो असे म्हटले जाते. पण कच्चे बदाम भिजवून खाल्ल्याने खरंच फायदा होतो की फक्त एक अफवा आहे? जाणून घ्या याबाबत तज्ज्ञ काय सांगतात..

बदाम भिजवून खाल्याने खरोखरच फायदा होतो की ही केवळ अफवा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Right Way To Nuts Eating: डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट्स खाऊन केली पाहिजे. बरेच लोक हे पाळत नाहीत, तर काही लोक असे आहेत जे ते अत्यंत गंभीरपणे फॉलो करतात. आता प्रश्न असा पडतो की ड्रायफ्रूट्स खाणे गरजेचे आहे. मात्र सुके डायफ्रूटस खायचे की ते भिजवून खायचे. दोघांपैकी कोणता मार्ग अधिक फायदेशीर आहे? तर जाणून घेऊया याचे नेमके उत्तर तज्ज्ञांकडून…

आज आपण बदामाबद्दल जाणून घेऊया, की ते नेमके कसे खावे. बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये सूक्ष्म पोषक घटक आढळतात. बदाम खूप गरम असल्याने बदाम पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला अनेकजण देतात. पण यामागे काय तर्क आहे ते आजपर्यंत समजलेले नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तज्ज्ञांच्या मते भिजवलेले बदामच का खावे?

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे..

आहारतज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने रोज बदाम खावे, ज्यामुळे आरोग्य उत्तम राहते. कच्चे बदाम खाण्याऐवजी पाण्यात भिजवून बदाम खावे. यामागचे कारण सांगताना गरिमा सांगतात की, बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. जर तुम्ही कच्चे बदाम खाल्ले तर त्यात आढळणारे फायटिक अॅसिड आतड्यात अॅसिड तयार करू लागते.

( हे ही वाचा: लसूण खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होईल; फक्त खाण्याची पद्धत जाणून घ्या)

कच्च्या बदामात आढळणारे घटक

मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक बदामामध्ये आढळतात. पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनास मदत होते. यामध्ये आढळणारे फायटिक अॅसिड्स सहज पचतात. बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यात आढळणाऱ्या संयुगाचा प्रभाव कमी होतो. जर तुम्ही बदाम पाण्यात भिजवून खात असाल तर बदामाची चव वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 15:51 IST

संबंधित बातम्या